Shocking : लहान मुलानं गिळलं नेलकटर; तुमच्या मुलाच्या हातात कोणती वस्तू आहे यावर लक्ष द्या

वेळीच सावध व्हा. असं काहीतरी तुमच्यासोबत होऊ देऊ नका.   

Updated: Sep 20, 2022, 01:24 PM IST
Shocking : लहान मुलानं गिळलं नेलकटर; तुमच्या मुलाच्या हातात कोणती वस्तू आहे यावर लक्ष द्या
nashik 8 Month old baby swallow nail cutter

नाशिक : आजपर्यंत मुलाने नाणे गिळल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील मात्र आता चक्क नेलकटर  गिळल्याचा प्रकार नाशिकरोड भागात समोर आला आहे. के. सी. मेहेता परिसरात 8 महिन्याच्या मुलाने चक्क नेल कटर गिळल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. आशिष दीपक शिंदे असे या मुलाचे नाव आहे. (nashik 8 Month old  baby swallow nail cutter)

गळ्यापासून पासून तब्बल 22 सेंटीमीटर आत हे नेलकटर गेलं होतं. वसंतराव मेडिकल कॉलेजच्या डॉ. शशिकांत पोळ यांच्या टीमने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर गळ्यात अडकलेले नेलकटर काढत यशस्वी शस्त्रक्रिया केली. या लाहनग्याची तब्येत आता सुधारत असून  टीमचंही सर्वत्र कौतुक होत आहे. (Medical Emergancy)

(Small Boy) मुलगा खेळत असताना हे नेलकटर गिळल्याटं त्याच्याच आईने सांगितलं. मुद्दा असा, की लहान मुलांच्या हातात अनेकदा अशा गोष्टी जातात ज्या त्यांच्यासाठी धोक्याच्या ठरू शकतात. कामाच्या व्यापात तुमचंही मुलांकडे दुर्लक्ष होत असेल आणि त्यांच्या हाती अशाच वस्तू जात असतील तर तुम्हीही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. 

वाचा : पुण्यात दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी, घटना CCTV मध्ये कैद

 

आशिषसोबत जे घडलं ते आपल्या मुलासोबत होऊ न देण्यासाठी पालकांनो सतर्क राहा. कारण, हे संकट वेळीच लक्षात आलं आणि टाळताही आलं. पण, प्रत्येत वेळी दैव बलवत्तर असेलच असं नाही. त्यामुळं सतर्कता केव्हाही फायद्याची.