मुंबई : कोरोनाच्या महामारीनंतर यंदाचा गणोशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या थाटामाटत साजरा झाला. यंदाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांमध्ये असणारं उत्सावाचं वातावरण. जेवढा आनंद मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी घेतला तितकाचं आनंद पोलिसांनी देखील घेतला. मंडळातील गणपतींचा व्हिडिओ असो की नागरिकांच्या घरातील गणपतींच्या व्हिडिओंचा सोशल मीडियावर सर्वत्र धूमाकूळ सुरु असतानाच मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला तो गणपती मिरवणूकीत नाचणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ. गणेशोत्सवाच्या काळात कर्तव्याच पालन केल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणूकीत अनेक पोलिसांनी डान्स केला होता.
यंदाच्या गणपती मिरवणूरकीत अनेक पोलिसांनी (Police) खाकी वर्दीमध्ये डान्स केला होता. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या व्हिडिओंची दखल घेत कोणत्याही पोलिसांनी गणवेशात नाचू नये अशा सुचना राज्य पोलीस संचालक कार्यालयाकडून (Police Director Office) दिल्या आहेत.याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वयक्तिक पातळीवर भाषण देताना दिसून आले, काही ठिकाणी ढोल वाजवत होते. त्यांचे व्हिडिओ आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहेत. याची दखल पोलीस मुख्यालयानं घेतली आहे.
त्याचबरोबर, राज्य पोलीस संचालक कार्यालयाकडून पोलिस अधीक्षक (SP) स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करायला सांगण्यात आलं आहे. तसेच, बंदोबस्तात तैनात असताना कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाही न होण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.