पहिला समोर आला, अजून 20 बारसकर यायचेत! आरोपांवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

 Maratha Reservation : 'तुकोबांबद्दल काही बोललो असेल तर माफी मागतो.  बारसकरांच्या आरोपांवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 21, 2024, 06:12 PM IST
पहिला समोर आला, अजून 20 बारसकर यायचेत! आरोपांवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया title=

 Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Baraskar :  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली. मनोज जरांगे पाटील यांनी  अजय महाराज बरासकर यांच्या आरोपांना प्रत्युतर दिले  आहे. पहिला समोर आला, अजून 20 बारसकर बाहेर येतील असा पलटवार जरांगे यांनी केला आहे. 

अजय महाराज बारसकरांनी तुकाराम महारांजांच्या अपमानासंदर्भात जरांगेंवर केलेल्या आरोपांना जरांगेंनी उत्तर दिलंय. बारसकरांवरील रागाच्या भरात जर आपण तुकराम महाराजांचा अपमान केला असेल तर माफी मागतो अशी भावना जरांगेंनी व्यक्त केलीय. 

अजय महाराज बरासकर यांनी जरांगेवर नेमके काय आरोप केले?

मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं असं सांगत जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात असा आरोप बारसकरांनी केलाय.