कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर सापडले 54 डेटोनेटर

कल्याण रेल्वे स्थानकात 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर 54 डेटोनेटर  सापडले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. 

Updated: Feb 21, 2024, 05:59 PM IST
कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर सापडले 54 डेटोनेटर  title=

Kalyan Crime News :  कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ उडाली आहे.  कल्याण रेल्वे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर डेटोनेटर सापडले आहेत.  जवळपास 54 डेटोनेटर आहेत.  रेल्वे पोलीस, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.  एका बॉक्स मध्ये हे डेटोनेटर ठेवण्यात आले होते. शोध पथकं अधित तपास करत आहेत. 

कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या शेजारी डेटोनेटरच्या  54  कांड्या आढळून आल्या आहेत. या कांड्या एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. प्लॅटफॉर्म नंबर एकच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली हे बॉक्स ठेवण्यात आले होते.

रेल्वे स्थानकाजवळ संशयीत बॉक्स आडळल्याची माहिती मिळताच रेल्वे  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या कांड्या ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू केलाय .दरम्यान या कांड्या या ठिकाणी कोणी ठेवल्या होत्या हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढच्या तपासाला गती मिळणार आहे. दरम्यान रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील इंट्री आणि एक्झिट ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आता तपासायला सुरुवात केली आहे.

रायगड जिल्ह्यात सापडली होती स्फोटकं 

डिसेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती. माणगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डिटोनेटर हस्तगत करण्यात आले होते. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीसांची ही मोठी कारवाई केली होती. जिलेटीन आणि डिटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला होता. हा टेम्पो पुण्यातून रायगडमध्ये स्फोटकं घेऊन येत होता. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती.