महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट...'या' मंदिरातील उत्सव रद्द

त्र्यंबकेश्वरमधील महाशिवरात्री उत्सव रद्द 

Updated: Mar 6, 2021, 08:31 PM IST
महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट...'या' मंदिरातील उत्सव रद्द  title=

कोरोनामुळे अनेक सणांवर निर्बंध आले, तर काही सण हे आपल्याला अटींनुसारच साजरे करावे लागले. कोरोनाला येऊन वर्ष लोटलं तरीही सणांवरील कोरोनाचं सावट काही जाता जात नाहीये. त्र्यंबकेश्वरमध्ये 11 मार्चला होणारा महाशिवरात्रीचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे.

खरंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 14 मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. इतकंच नाही तर त्र्यंबकनगरीमध्ये 10 ते 14 मार्चपर्यंत कलम 144 म्हणजेच जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.

मंदिर भाविकांसाठी बंद असलं तरी नियमित होणारी पूजा आणि महाशिवरात्रीनिमित्त होणारी पूजा होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या पाहता धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावरही राज्य सरकारने बंदी घातली होती.