मनसुख हिरेन यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार

शवविच्छेदन अहवालात घातपात नसल्याचं स्पष्ट 

Updated: Mar 6, 2021, 09:12 PM IST
मनसुख हिरेन यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार title=

मुंबई : मनसुख हिरेन ( Mansukh Hiren ) यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरेन यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह आज संध्याकाळी स्वीकारलेला. आधी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला होता. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह स्वीकारू अशी भूमिका मनसुख यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. याशिवाय पोस्टमार्टम अहवाल आणि मृत्यूचं कारण आधी जाहीर करा त्यानंतर पोस्टमार्टम करतानाचं चित्रीकरणही आम्हाला दाखवा तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा हिरेन यांच्या कुटुंबीयांनी घेतली होता. हिरेन यांच्या फुफ्फुस आणि टायटोम डीएनए टेस्ट करण्यात यावी, अशी अट कुटुंबीयांची होती. 

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर हिरेन कुटुंबियांनी मनसुख यांचा मृतदेह स्वीकारला. आहे. त्यानंतर ठाण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकांची गर्दी झाल्यानं मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. येत्या सोमवारी माजीवाड़ा ठाणे जंक्शन इथे तेरापंथ सभा भवनमध्ये सकाळी 11च्या सुमारास स्मृती सभा आयोजित केली जाणार आहे.