Maharastra Politics: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. सगळं मला पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला आहे.
राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहजे यांना पहिलं खाली खेचले पाहिजे, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलंय. ही लोकं सत्तेसाठी लायक नाही. देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचं विधान देखील त्यांनी यावेळी केलं आहे. न्याययंत्रणा तुमच्या बुडाखाली घेणार आहात का? असा परखड सवाल देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On BJP) यांनी यावेळी विचारला आहे.
प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटचं लोकार्पण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ठाकरे आणि आंबेडकर एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांचा हवाला देत आपण जर लोकशाही वाचवू शकलो नाही, तर आपल्याला प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा नातू म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असंही वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केला आहे.
आणखी वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर शेवटी एकत्र येणारच?
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत. आंबेडकर आणि आमची वैचारिक बैठक एकच आहे, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊ, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्यात नवी युती उभी राहणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.