Maharashtra Weather Latest News: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन झाल्याने गोविंदा पथकासह राज्यातील शेतकरी सुखावले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक वरुणराजाने हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather Update maharashtra rain alert monsoon active imd predicted heavy rain in maharashtra mumbai pune)
दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन झालंय., मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये बोरिवली कांदिवली, मालाड, दहिसर, अंधेरी भागात पाऊस होतोय..महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत पाऊस सुरुंय..
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल महिनाभरानंतर पावसानं पुन्हा कमबॅक केलंय. पावसाच्या आगमनाने करपून चाललेल्या पिकांना काही प्रमाणात का होईना जीवदान मिळालंय. त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणा-या बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय.
सोलापूर जिल्ह्यात महिन्याभरानंतर पाऊस परतणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यात साधारणपणे 35 ते 40 मिमी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. महिन्याभरापासून जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊस नसल्याने बहुतांश खरिपाची पिकं नष्ट झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली मात्र जिल्ह्याला मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. सध्या वातावरणात 80 ते 85 टक्के आर्द्रता आहे. त्यामुळे पाऊस परतण्याचा अंदाज आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालंय. जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पहिलाच पाऊस बरसला. त्यामुळे या भागातले शेतकरी आनंदात आहेत. तर धोक्यात आलेल्या अनेक पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळालं आहे.
दुष्काळाच्या सावटातील नंदुरबार जिल्ह्याला पावसानं काहीसा दिलासा दिलाय. नंदुरबार, शहादा, तळोदा, तालुक्यात पावसानं हजेरी लावली. यामुळे पिकांना काही अंशी जीवदान मिळालंय. जिल्ह्यात गेल्या 27 दिवसापांसून पावसानं दडी मारली होती. तर आता झालेल्या पावसामुळे कापसाच्या पिकालाही दिलासा मिळणाराय.
मोठ्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्हात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे धानपिकाला नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी सुखावलाय. गेले अनेक दिवस पावसाने ओढ दिल्यानं इथले शेतकरी चिंतेत होते. तर पिकांनीही माना टाकल्या होत्या. अशावेळी झालेल्या पावसाने पिकांबरोबरच बळीराजालाही दिलासा मिळालाय.
परभणी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसानं उघडीप दिली होती. परिणामी पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र सायंकाळच्या सुमाराला परभणी जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यात तब्बल 16 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झालं. यामुळे खरिपाच्या सुकत असलेल्या सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसह फळबागाना नवसंजीवनी मिळणार आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्याने हैराण वाशिमकरांना दिलासा मिळालाय.
उजनी धरणात केवळ 17 टक्केच पाणीसाठा राहिलाय. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढलीय. धरण परिसरातील बहुतांश शेती उजनीच्या पाण्यावर अलंबून आहे. यंदा पावसानं ओढ दिल्यानं उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्याचा परिणाम आता शेतीवर दिसू लागलाय. सप्टेंबरमध्ये पाऊस झालाच नाही तर उजनी पट्ट्यातील शेतीची अवस्था अत्यंत बिकट होऊ शकते.
राज्यावर दुष्काळाचं सावट असलं तरी मराठवाड्यात मात्र परिस्थिती अधिकच विदारक होत चाललीय. 40 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यातली पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आलीय. त्यामुळे सरकारनं मदत करण्याची मागणी मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांनी केली
सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे शेतीचा, पिण्याचा आणि जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झालाय. तलाव कोरडे पडत असून तातडीने पेड-मोराळे सिंचन योजनेच्या माध्यमातून तलाव भरून देण्याच्या मागणीसाठी, भारतीय शेतकरी कामगार पक्षानं आंदोलन केलं.
येवल्यात टॅंकरचं पाणी विकत घेऊन पिकाला पाणी देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. येवला तालुक्यातील अनकाई येथील कांदा उत्पादक शेतक-यांनी पाऊस पडेल या आशेने कांद्याची लागवड केली. मात्र 2 महिने पावसानं दडी मारल्यानं, पाणी विकत घेऊन कांदा पीक जगवण्याची धडपड शेतकरी करताना दिसताहेत.
दुष्काळ शेतक-यांना आणि कांदा ग्राहकांना रडवणार असल्याचं दिसतंय. देशाला कांदा पुरवणा-या नाशिक जिल्ह्यात खरिपातली कांदा लागवड केवळ 2 टक्क्यांवर आलीय. पावसानं पाठ फिरवल्यामुळे जवळपास 55 हजार हेक्टरवर होणारी लागवड केवळ २ हजार हेक्टरपर्यंत घटलीय. त्यामुळे ऐन दिवाळीत कांद्याचे दर भडकण्याची शक्यता आहे.