BREAKING | कोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार?

कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेनेला खिंडार पडणार?

Updated: Jul 17, 2022, 10:41 AM IST
BREAKING | कोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार? title=

प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर : शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याच दरम्यान आता वेगवेगळ्या भागातील शिवसेनेतील नेते शिंदे गटात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

खासदार संजय मंडलिक शिंदे गटासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. - संजय मंडलिकांचा मातोश्रीपासून काहीसा दुरावा ठेवल्याची चर्चा रंगली आहे. 

कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर मंडलिक दिल्लीत निर्णय जाहीर करणार असल्याने आता शिवसेनेत धाकधूक आहे. तर मंडलिक नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दुसरीकडे  पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.  खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.