Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Feb 18, 2023, 06:56 AM IST
Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार... title=
maharahstra politics Shiv Sena Bhavan is a Shivai Trust building and Samana is Prabodhan Prakashan so Shiv Sena Bhavan belongs to Uddhav Thackeray no right of Shinde group in marathi news

Maharashtra Politics  Shinde group Vs Thackeray group :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकाल बाकी असताना अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना (shivsena)  पूर्णपणे बिथरली.  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban)  हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे दिलें यामुळे उद्धव ठाकरे गटात भूकंप झाला. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही निसटल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये निशब्द झाले. तरदुसरीकडे शिंदे गटातील (Shinde-Thackeray Group) समर्थकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. काही ठिकाणी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडाही झाला. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शहर कार्यालयावर शिंदे गटाचे कार्यकर्त्ये ताबा घेण्यास पोहोचले. त्यानंतर मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipality) शिवसेना कार्यालयावर शिंदे गटानं दावा ठोकला. म्हणून मग मुंबईतील (Mumbai News) शिवसेना भवन कोणाचं त्यावर चर्चा सुरु झाली. 

शिवसेना भवन उद्धव ठाकरेंकडेच?

शिवसेना भवन ही इमारत म्हणजेच शिवसेना भवन मुख्यालय हे 'शिवाई ट्रस्ट' ची (Shivai Trust) इमारत असल्याने ती इमारत उद्धव ठाकरेंकडे राहणार आहे. शिवसेना भवन ही इमारत पक्षाच्या नावावर नाही, त्यामुळे यावर शिंदे गटाचा अधिकार नाही.. तर शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टच्या नावावर असल्याने ती अधिकृतपणे उद्धव ठाकरेंची आहे. त्यावर पक्षाचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे शिंदे गट शिवसेना भवनावर (shiv sena bhavan owner) दावा करु शकतं नाही.  याशिवाय सामना (Samana) हे पक्षाचे मुखपत्र प्रबोधन प्रकाशनच्या (Prabodhan Prakashan) वतीने प्रकाशित करण्यात येतं. त्यामुळे त्याचाही पक्षाशी काही संबंध नाही. याचाच अर्थ शिवसेना भवन आणि सामना या मुखपत्रावर फक्त उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे. त्याचा शिवसेना या पक्षाशी काही संबंध नाही. (maharahstra politics Shiv Sena Bhavan is a Shivai Trust building and Samana is Prabodhan Prakashan so Shiv Sena Bhavan belongs to Uddhav Thackeray no right of Shinde group in marathi news)