Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. आज राज्यातील सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया.
20 Nov 2024, 20:48 वाजता
नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारे वाहन मतदान केंद्रातून बाहेर निघाले तेव्हा त्या वाहनावर हल्ला करण्यात आला. त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केले आणि पोलिसांना बोलावले.
20 Nov 2024, 18:38 वाजता
इलेक्टोरेल एज नुसार महायुती 121, महावि 150 तर इतर17 जागा येण्याची शक्यता आहे.
पोल डायरीनुसार महायुती 122 ते 176, माहवि 69 ते 121 तर इतर 12 ते 19 जागा येण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्टेटेजीस नुसार महायुती 152 ते 160, महावि 130 ते 138 तर इतर 6 ते 8 जागा येण्याची शक्यता आहे.
20 Nov 2024, 16:45 वाजता
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तर यांना मारहाण झाली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे नितेश कराळे यांनी सांगितले. कराळे मास्तरांना उमरी मेघे गावात मारहाण झाली. कराळे मास्तर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सावंगी पोलीस ठाण्यात पोहोचले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
20 Nov 2024, 15:58 वाजता
सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांसोबत भिडले. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप आहे.
पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. भाजप कार्यकर्त्यांना दडपल्याने पोलिसांना लाड व दरेकरांनी जाब विचारला.
20 Nov 2024, 15:37 वाजता
महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरु आहे.
20 Nov 2024, 13:37 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानाचा वेग मंदावला; 1 वाजेपर्यंत फक्त 'इतकेच' टक्के मतदान
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे. राज्यात सकाळी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान झालं आहे. सर्वात कमी मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे.
20 Nov 2024, 13:20 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: लातूर जिल्ह्यातील 'त्या' गावाचा मतदानावर बहिष्कार
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी या गावातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. 923 मतदारांनी गावातील प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षापासून या गावात समशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. समशानभूमीचा विषय मार्गी लागावा यासाठी अनेक वेळेस आंदोलने आणि निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
20 Nov 2024, 12:51 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: फुलाची शिरोली इथं भगव्या टोप्यांवरून तणाव
मतदान करण्यासाठी मतदारांनी भगवी टोपी घातल्याने पोलिसांनी हटकलं. भगव्या टोपीला विरोध केल्याने कार्यकर्त्यांनी गोल टोपी आणि हिजब घालून येणाऱ्या मतदारांना विरोध करण्याची केली मागणी. शिरोली इथल्या मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून केला प्रशासनाचा निषेध. कोणत्याही परिस्थितीत भगवी टोपी घालूनच मतदान करण्याचा मतदारांनी घेतला पवित्रा
20 Nov 2024, 12:32 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: चंद्रपुरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले मतदान
चंद्रपुरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केले. चंद्रपूर शहरातील सिटी माध्यमिक शाळेत सहकुटुंब मतदान करत त्यांनी कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढविला. मुनगंटीवार स्वतः बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.
20 Nov 2024, 12:31 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मावळ तालुक्यात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंक पोलिंग स्टेशन
मावळ तालुक्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातीलच मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंक पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. या पिंक पोलिंग स्टेशनमध्ये सर्व महिला कर्मचारी कार्यरत असून पिंक कलरची थीम ठेवण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी देखील या पिंक पोलिंग स्टेशनला महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे.