Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. आज राज्यातील सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया.
20 Nov 2024, 11:42 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: आदिती तटकरे यांची मतदान केंद्रांना भेट
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे आज सकाळीच घराबाहेर पडल्या. त्यानी आपल्या मतदार संघातील मतदान केंद्राना भेटी देत मतदारांशी संवाद साधला
20 Nov 2024, 11:31 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान; सर्वात कमी मतदान...
राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झालं आहे. कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झाले याची आकडेवारी खालीलप्रमाणे
1) अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) - 18.24%
2) अकोला - 16.35%
3) अमरावती -17.45 %
4) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 18.98 %
5) बीड - 17.41 %
6) भंडारा - 19.44 %
7) बुलढाणा - 19.23 %
8)चंद्रपूर - 21.50 %
9) धुळे- 20.11 %
10) गडचिरोली - 30.00 %
11) गोंदिया - 23.32%
12) हिंगोली - 19.20 %
13) जळगाव - 15.62%
14) जालना- 2129%
15) कोल्हापूर - 20.59 %
16) लातूर - 18.55 %
17) मुंबई शहर - 15.78%
18) मुंबई उपनगर- 17.99%
19) नागपूर- 18.90 %
20) नांदेड- 13.67 %
21) नंदुरबार - 21.60 %
22) नाशिक - 18.71 %
23) धाराशिव (उस्मानाबाद) - 17.07 %
24) पालघर- 19.40 %
25) परभणी - 18.49 %
26) पुणे- 15.64 %
27) रायगड- 20.40 %
28) रत्नागिरी-22.93 %
29) सांगली -18.55 %
30)सातारा-18.72 %
31) सिंधुदूर्ग- 20.19 %
32) सोलापूर - 15.64 %
33) ठाणे- 16.63 %
34)वर्धा - 18.86 %
35)वाशिम - 16.22%
36) यवतमाळ- 19.38 %
20 Nov 2024, 11:12 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान
20 Nov 2024, 10:54 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला
#WATCH | Maharashtra Deputy CM & BJP candidate from Nagpur South-West Assembly seat, Devendra Fadnavis, his wife Amruta Fadnavis and mother Sarita Fadnavis show their inked finger after voting for #MaharashtraElections2024, at a polling booth in Nagpur. pic.twitter.com/GLD6BKIqpT
— ANI (@ANI) November 20, 2024
20 Nov 2024, 10:32 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: नांदगावमध्ये कांदे- भुजबळ समर्थक भिडले
समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्या समर्थकांमध्ये राडा. आ.सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले असा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळावर निवडणूक आयोगाचे पथक दाखल. थांबविलेल्या मतदारांची चौकशी व बॅग तपासणी सुरु
20 Nov 2024, 10:22 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं होतं, तुम्ही आजपर्यंत...; राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'मतदान कमी केल्यानं आपल्या पदरी काय कमी येईल याचा विचार करावा. आपलं मत व्यक्त करणं अतिशय महत्त्वाचं. मतदानापासून बाजूला हटणं हा काही पर्याय नाही'. असं म्हणत मतदान करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे 'मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं होतं, तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील, मागील दोन दिवसांमधील हल्ल्यांविषयी बोलताना असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
20 Nov 2024, 10:14 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: अजित दादा एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार: जय पवार
सगळे बारामतीकर पूर्वीपासून सगळ्यांवर प्रेम करतात. लोकसभेला साहेब आणि विधानसभेला दादा हे समीकरण लोकांमध्ये आहे. गुलाल नक्की आपलाच असेल. अजित दादा एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील. मी सगळ्या मतदान केंद्रावर जात आहे, त्यामुळे थोड्या वेळाने वेळात वेळ काढून मी मतदान करणार आहे, असं अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलं आहे.
20 Nov 2024, 10:04 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर तोडण्यात येत आहे, माविआच्या उमेदवाराचा आरोप
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघांमध्ये मतदान करू दिलं जात नाही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत मात्र त्या ठिकाणचे वायर तोडली जात अनेक ठिकाणी बोगस मतदान सुरू आहे जिल्हाधिकारी हे सालगड्यासारखं काम करत असल्याचा आरोप, महाविकास आघाडीचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी केलेला आहे
20 Nov 2024, 09:48 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SP) उमेदवार रोहित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आई सुमनताई पाटील यांच्यासह अंजनी इथल्या आपल्या गावी मतदान केंद्रावर पोहोचत रोहित पाटील आणि आमदार सुमनताई यांनी मतदान केलं आहे,यावेळी रांगेत उभे राहून रोहित पाटलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. घरातून मतदानाला निघताना आबा कुटुंबाकडून रोहित पाटलांचा औक्षण देखील करण्यात आले.
20 Nov 2024, 09:43 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात सकाळीच ईव्हीएम बंद
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कस्तुरबा नगर परिसरात विनयालय शाळेमधील मतदान केंद्रावर सकाळीच ईव्हीएम बंद पडली आहे. 18 मतदारांचे मतदान झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडले आहे.