Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. आज राज्यातील सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया.
20 Nov 2024, 09:36 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी लातूरच्या बाबळगाव या त्यांच्या मुळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
#WATCH | Actor couple Riteish Deshmukh and Genelia D'Souza cast their votes at a polling station in Latur for #MaharashtraAssemblyElections pic.twitter.com/Zi4XzwKt2O
— ANI (@ANI) November 20, 2024
20 Nov 2024, 09:01 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: पहिल्या दोन तासांत महाराष्ट्रात 6.61 टक्के मतदान
पहिल्या दोन तासांत महाराष्ट्रात 6.61 टक्के मतदान पार पडलं आहे. गडचिरोलीत 12.33 टक्के मतदान झाले आहे. तर, संभाजी नगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघे 7.5 टक्के मतदान
20 Nov 2024, 08:20 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: विजय माझाच होईल, दिलीप वळसे पाटलांना विश्वास
सलग सात वेळा आमदार झालेले दिलीप वळसे पाटील आठव्यांदा आंबेगावच्या निवडणुकीला सामोरे जातायेत. पत्नी आणि लेकिन औक्षण केल्यावर ते मतदानासाठी निघालेत. मात्र यावेळी थेट शरद पवारांनी गद्दारीचा शिक्का मारत थेट आमच्यात कौटुंबिक संबंध नव्हेत, असं सूचित केलं. पण शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर ही विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केलाय.
20 Nov 2024, 08:03 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: बारामती युगेंद्र पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
बारामतीत युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या आई शर्मिला पवार यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
20 Nov 2024, 07:51 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: समीर भुजबळांनी केलं मतदान
नांदगाव मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी कुटुंबीयासह केले मतदान
20 Nov 2024, 07:48 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला
स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज पहाटेच्या वेळी मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता शेगाव कडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान प्रस्थापितांना या उमेदवाराची भीती वाटत असल्याने हा हल्ला झालं असल्याची प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.
20 Nov 2024, 07:47 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटना आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या ५ हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार. रात्री दीड वाजेच्या सुमारास घडला प्रकार
20 Nov 2024, 07:43 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: बारामतीः युगेंद्र पवार यांचे आई शर्मिला पवार यांनी केले औक्षण
बारामती मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार मतदान केंद्रावर पोहोचण्याआधी त्यांच्या आई शर्मिला पवार यांनी त्यांचे औक्षण केले.
20 Nov 2024, 07:41 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: माझा विजय नीच्छित, विजयाचा गुलाल मी उधळणारः यामिनी जाधव
भायखळा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी लढत होत आहे. शिंदे गटाकडून यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर असा सामना रंगला आहे. शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला आहे. माझ्या तब्येतीला घेऊन माझ्यावर टीका करण्यात आली. लोकसभेत माझा पराभव झाला नाही तर मी मागे राहिले होते.अवघे काही दिवस मला प्रचारासाठी मिळाले होते. इतरांनी माझ्या एवढी मते घेऊन दाखवावी, असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे.
20 Nov 2024, 07:16 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रात बिघाड
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रात बिघाड झाला आहे. तब्बल 20 मिनिटे मतदानासाठी उशीर होत आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 164 मधील प्रकार. बॅलेट युनिट मधील मतदान यंत्रात बिघाड झाला आहे.