Maharashtra Election LIVE Updates: नागपुरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा. 

 Maharashtra Election LIVE Updates:  नागपुरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. आज राज्यातील सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया. 

20 Nov 2024, 07:14 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: माढा मतदारसंघातील लढत अटीतटीची

माढा विधानसभा मतदारसंघात तीन लाख 52 हजार 691 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार असून 14 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजीत पाटील आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे या दोघांमध्ये आहे. बबनराव शिंदे यांच्या तीस वर्षांच्या सत्तेला अभिजित पाटील यांनी आव्हान दिलेला आहे आता मतदार कोणाला कौल देतात हे पाहावे लागेल.

20 Nov 2024, 07:11 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मतदानाच्या आदल्या रात्री चंद्रपुरातील एका घरातून 12 लाखांची रोकड जप्त

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातल्या गडचांदूर शहरात सुमारे 12 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशिष्ट तक्रारीनंतर एका घरावर धाड घालून रकमेची जप्ती करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रात्री उशिरा एका बंद घरातून ही कारवाई केली. राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस- शेतकरी संघटना आणि भाजप उमेदवारांमध्ये कडवी लढत आहे. निवडणूक यंत्रणा आणि आयकर विभागाची चमू प्रकरणाचा अधिक तपास करत आहे

20 Nov 2024, 07:07 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

अजित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, पवारांच्या आईंनी 17 नोव्हेंबर रोजी मतदान केले होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी घरुनच मतदान केलं होतं. 

20 Nov 2024, 07:01 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मतदानाला सुरुवात; मोहन भागवतांनी बजावला हक्क

नागपूरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, 

 

20 Nov 2024, 06:58 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघांमध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अचलपूर मधून बच्चू कडू पाचव्यादा,बडनेरा मधून रवि राणा चौथादा तर तिवसा मधून यशोमती ठाकूर चौथादा निवडणूक रिंगणात. अमरावती जिल्ह्यात 2 हजार 708  मतदान केंद्र असून यामध्ये 12 लाख 52 हजार 680 महिला मतदार असून यासह 12 लाख 93 हजार 681 एवढे पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये 11 हजार 919 कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असून,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 2 हजार 745 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहे, तर 1877 होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. 

20 Nov 2024, 06:58 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात

विधानसभा निवडणुकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.