Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपली असतानाही अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर.

Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. त्यात जागावाटपचा तिढा आणि त्यातून मित्र पक्षांमध्येही ओढवलेली नाराजी. दुसरीकडे पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघ्ये काही दिवस उरले असताना इतर मतदारसंघात कोणता उमेदवार उभा राहणार हे अद्याप ठरलं नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी पाहिला मिळत आहे. 
अनेपक्षित कोणाचं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश असो किंवा नाराजी सत्र असो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आणि तुमच्या मतदार संघातील घडामोडीबदद्ल जाणून घ्या एका क्लिकवर 

 

3 Apr 2024, 11:49 वाजता

Loksabha Election 2024 Live : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार?

लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतना अशी चर्चा रंगू लागली आहे. खुद्द एकनाथ खडसे यांनी संकेत दिल्यामुळे या चर्चांना उत आला आहे. 

अधिक माहितीसाठी ही लिंक क्लिक करा - कार्यकर्त्यांना विश्वासात घेत एकनाथ खडसे भाजपात परतणार?

 

3 Apr 2024, 11:05 वाजता

Loksabha Election 2024 Live : बाळासाहेबांचं शरद पवारांना लिहिलेलं जुनं पत्र व्हायरल

लोकसभा निवडणूकमध्ये नेते एकमेकांवर अतिशय खालच्या स्थारावर जाऊन टीका करत आहेत. अशातच बाळासाहेब यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिलेलं होतं. ते जुनं पत्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. 

अधिक माहितीसाठी ही लिंक क्लिक करा - 'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

 

3 Apr 2024, 11:01 वाजता

Loksabha Election 2024 Live : अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा यांची खडाजंगी

आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल उपस्थित राहणार आहे. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - 'अमरावतीत कोणाची लाट नाही..नेते लाचार...', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपाटले दंड

 

3 Apr 2024, 10:59 वाजता

Loksabha Election 2024 Live : नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे - राऊत 

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे...आम्ही या सामन्याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी राणेंना डिवचलंय...विनायक राऊतांचा विक्रमी मतांनी विजयी होईल असा दावा राऊतांनी केलाय...कोकणातील जागेवरून महायुतीत चढाओढ असताना राणेंनी शक्तिप्रदर्शन केलंय...त्यामुळे 

 

3 Apr 2024, 10:24 वाजता

Loksabha Election 2024 Live : 'सांगली'वरून 'मविआ'मध्ये पहिली वादाची ठिणगी

काँग्रेसच्या कुठल्याही बैठकीला हजर राहणार नाही असा टोकाचा निर्णय विश्वजित कदम यांनी घेतला आहे. त्यामुळे सांगीलमध्ये महा विकास आघाडीमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे. 

 

3 Apr 2024, 10:22 वाजता

Loksabha Election 2024 Live :  'एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट'

एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट केल्याचा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचाही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

 

3 Apr 2024, 10:20 वाजता

Loksabha Election 2024 Live :  भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज - संजय राऊत 

उन्मेष पाटल आज उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जळगाव मतदारसंघातील निवडणूक रंगत होणार आहे, असा विश्वास सजंय राऊत यांनी व्यक्त केला. दोन दिवसांमध्ये जळगवाचा उमेदवार जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

3 Apr 2024, 10:19 वाजता

Loksabha Election 2024 Live :  भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज - संजय राऊत 

उन्मेष पाटल आज उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जळगाव मतदारसंघातील निवडणूक रंगत होणार आहे, असा विश्वास सजंय राऊत यांनी व्यक्त केला. 

 

3 Apr 2024, 10:06 वाजता

Loksabha Election 2024 Live :  देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवारांचा प्रहार 

शरद पवार हे आता संपलं आहे, असा सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी वार केला. त्यांच्या या प्रहारावर शरद पवार यांनी जोरदार सडेतोड उत्तर दिलंय.  

नेमकं काय आहे प्रकरण संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - 'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला

 

3 Apr 2024, 09:45 वाजता

Loksabha Election 2024 Live :  वाशिम - यवतमाळमध्ये आमचा उमेदवार उद्या अर्ज भरेल - उदय सामंत 

वाशिम यवतमाळमध्ये आमचा उमेदवार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. त्याशिवाय उमेदवारी कुणाला द्यायचा हा अधिकार शिंदेंचा आहे, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. संजय राठोडांची वाशिम यवतमाळमध्ये मोठी ताकद आहे.