Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपली असतानाही अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर.

Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. त्यात जागावाटपचा तिढा आणि त्यातून मित्र पक्षांमध्येही ओढवलेली नाराजी. दुसरीकडे पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघ्ये काही दिवस उरले असताना इतर मतदारसंघात कोणता उमेदवार उभा राहणार हे अद्याप ठरलं नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी पाहिला मिळत आहे. 
अनेपक्षित कोणाचं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश असो किंवा नाराजी सत्र असो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आणि तुमच्या मतदार संघातील घडामोडीबदद्ल जाणून घ्या एका क्लिकवर 

 

3 Apr 2024, 08:42 वाजता

Loksabha Election 2024 Live :  अनंत गीते यांच्या सुनील तटकरेंवर हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सुनील तटकरेंनी बॅ. अंतुले, शरद पवार आणि जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केलीय.  विश्वासघातकी माणसाला मतदान करणार का असा सवालही गीतेंनी केलाय. 

 

3 Apr 2024, 08:41 वाजता

Loksabha Election 2024 Live :  रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठी बातमी!

उदय सामंत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार अशी पोस्ट व्हायरल होत आहे. X वरुन ट्वीट करत त्यांनी माघार घेतल्याच सांगितलंय. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ