Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma: अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली

सुरभि जगदीश | Updated: Jun 13, 2024, 07:18 AM IST
Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान title=

Rohit Sharma: भारत विरूद्ध अमेरिका यांच्यामध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव केला. टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय होता. या विजयासह अ गटात टीम इंडियाने 6 पॉईंट्सह अव्वल क्रमांकावर आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार खूश दिसून आला. 

विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली, त्याचं श्रेय आम्हाला जातं. सूर्या आणि दुबे यांनी शानदार खेळ दाखवत टीमला विजयापर्यंत नेलं. यै ठिकाणी क्रिकेट खेळणं सोप नव्हतं. आम्हाला खेळाच्या अंतापर्यंत टिकून राहणं गरजेचं होतं. या विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे.

110 रन्सवर ऑलआऊट झाली अमेरिका

या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी लाभदायक ठरला. यावेळी अमेरिकेने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 110 रन्स केले. या काळात नितीशकुमारने सर्वाधिक 27 रन्स केले. तर स्टीव्हन टेलरने 24 रन्सची खेळी केली. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 2 विकेट्स तर अक्षर पटेलला 1 विकेट घेण्यात यश मिळालं. 

टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय

टीम इंडियाने 111 रन्सचं लक्ष्य 18.2 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. यावेळी सूर्यकुमार यादवने विजयी खेळी खेळली. त्याने 49 बॉल्समध्ये नाबाद 50 रन्स केले. या खेळीत त्याने 2 फोर आणि 2 सिक्स लगावले. दुसरीकडे शिवम दुबेने सूर्यकुमार यादवला साथ देत नाबाद 31 रन्स केले. याशिवाय या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेले.