Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपली असतानाही अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर.

Loksabha Election 2024 Live : Loksabha Election 2024 Live : संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. त्यात जागावाटपचा तिढा आणि त्यातून मित्र पक्षांमध्येही ओढवलेली नाराजी. दुसरीकडे पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघ्ये काही दिवस उरले असताना इतर मतदारसंघात कोणता उमेदवार उभा राहणार हे अद्याप ठरलं नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी पाहिला मिळत आहे. 
अनेपक्षित कोणाचं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश असो किंवा नाराजी सत्र असो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आणि तुमच्या मतदार संघातील घडामोडीबदद्ल जाणून घ्या एका क्लिकवर 

 

3 Apr 2024, 17:34 वाजता

उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतील 8 आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय. या सर्व आमदारांची एकनाथ शिंदेंसोबत भेट घालून देणार असल्याचंही ते म्हणालेत. या आमदारांची नावं उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

3 Apr 2024, 14:54 वाजता

Loksabha Election 2024 Live : वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार करण्याचं काम पवारांनी केले - फडणवीस

वर्ध्यातून रामदास तडसांचा अर्ज भरताना फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार टीका केलीय. वर्ध्यातून पवारांनी पंजा गायब करून दाखवला, जे आमचं स्वप्न होतं ते पवारांनी पूर्ण केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसनं इतके वर्ष राजकारण केलं. त्याच महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार करण्याचं काम पवारांनी करून दाखवलं. त्यामुळे पवारांचे आभार मानतो अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.

 

3 Apr 2024, 14:48 वाजता

Loksabha Election 2024 Live : सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसची आज बैठक 

सांगली लोकसभेच्या जागावाटपावरुन काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होतेय. सांगलीतून विशाल पाटलांना मैदानात उतरवायचं की ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सोडायची याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीवर विश्वजित कदमांनी मात्र बहिष्कार टाकलाय. त्यांनी काल पत्र लिहून तसं नाना पटोलेंना कळवलंय. त्यामुळे आता काँग्रेसच्या बैठकीत  काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय. 

 

3 Apr 2024, 14:46 वाजता

Loksabha Election 2024 Live : महायुतीतील इच्छुकांची धाकधूक वाढली

महायुतीतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. 

 

3 Apr 2024, 14:44 वाजता

Loksabha Election 2024 Live : हेमंत पाटील यांचा पत्ता कट?

हिंगोलीतून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. बाबुराव कोहळीकरांच्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.  

 

3 Apr 2024, 13:32 वाजता

Loksabha Election 2024 Live : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर, तर जळगावातून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना संधी देण्यात आली आहे. 

 

3 Apr 2024, 12:50 वाजता

Loksabha Election 2024 Live : उमेदवारी नाकारल्याने माझी भूमिका नाही - उन्मेष पाटील 

मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही, असं म्हणत जळगावातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी झाली आहे. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बदल्याच्या भावनाने राजकारण केलं जातंय, असा आरोप उन्मेष पाटील यांनी केला. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - भाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

 

3 Apr 2024, 12:25 वाजता

Loksabha Election 2024 Live : देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे का मानले आभार?

वर्ध्यातील सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं जाहीर आभार मानले. वर्ध्यात भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली, असं ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

 

3 Apr 2024, 12:21 वाजता

Loksabha Election 2024 Live : उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतील 8 आमदार संपर्कात - उदय सामंत 

एकीकडे खडसेंच्या विधानानं चर्चांना उधाण आलं असताना उदय सामंतांच्या विधानानंही खळबळ उडालीय. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतील 8 आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय. या सर्व आमदारांची एकनाथ शिंदेंसोबत भेट घालून देणार असल्याचंही ते म्हणालेत. या आमदारांची नावं उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला... उदय समंतांच्या या द्याव्याचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय.. सामंतांनी सांगीतलेला आकडा चुकाय असा उपरोधीक टोला राऊतांनी सामंतांना लगावलाय.. 

 

3 Apr 2024, 12:20 वाजता

Loksabha Election 2024 Live : 'ते माझ्या मागे उभे राहतील'; स्मिता वाघ यांचा विश्वास

उन्मेष पाटील हे कोणताही निर्णय घेणार नाही...ते माझ्या मागे उभे राहतील असा विश्वास भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यक्त केलाय...2019 मध्ये माझे तिकीट कापून उन्मेष पाटील यांना पक्षाने संधी दिली होती...तेव्हा ही बहीण त्यांच्या मागे खंबीरपणे उभी होती...आता ते माझ्या मागे उभे राहतील असं भावनिक आवाहन भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी उन्मेष पाटील यांना केलंय...