Gajkasari Yog: कन्या राशीत 12 वर्षांनी बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

Gajkasari Yog 2024: गुरूचा चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो. गजकेसरी योग केवळ ग्रहांच्या संयोगाने तयार होत नाही, तर चंद्राने कोणत्याही राशीत प्रवेश केला असेल आणि त्यात गुरु शुभ ग्रह असेल तर हा राजयोग तयार होतो. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 12, 2024, 10:15 AM IST
Gajkasari Yog: कन्या राशीत 12 वर्षांनी बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता title=

Gajkasari Yog 2024: प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी गुरू सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. बृहस्पति हा शनि नंतरचा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ टिकतो. अशा परिस्थितीत गुरु ग्रहाशी कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा संयोग आहे. अशावेळी अनेक प्रकारचे शुभ योग तयार होतात. 

गुरूचा चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो. गजकेसरी योग केवळ ग्रहांच्या संयोगाने तयार होत नाही, तर चंद्राने कोणत्याही राशीत प्रवेश केला असेल आणि त्यात गुरु शुभ ग्रह असेल तर हा राजयोग तयार होतो. 14 जून रोजी गजकेसरी योग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार 14 जून रोजी सकाळी 1:54 वाजता चंद्र राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर 16 जून रोजी सकाळी 12:35 पर्यंत या राशीत राहील. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. 

कर्क रास (Kark Zodiac)

या राशीमध्ये गुरुची पाचवी दृष्टी तिसऱ्या भावात म्हणजेच शौर्य घरामध्ये पडेल, त्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरबाबतचा गोंधळ आता संपेल आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. वडील आणि गुरूंच्या आशीर्वादाने पुढे जाण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीमध्ये चंद्र चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. सुखसोयींसोबत मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो. या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल. सध्या सुरू असलेला मालमत्तेचा वाद संपुष्टात येणार आहे. मुलांकडून तुम्हाला काही आनंद मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंच भरारी घेऊ शकता. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या दहाव्या घरात गजकेसरी योग तयार होत आहे. करिअरमध्ये केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. काही नवीन काम सुरू करू शकता. सरकारकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला काही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकणार आहात. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)