जयप्रभा स्टुडिओ : लता मंगेशकर यांनी याचिका घेतली मागे

जयप्रभा स्टुडिओ संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका या स्टुडिओच्या मालक प्रसिद्धी पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी  मागे घेतली आहे. त्यामुळे वादावर पडदा पडलाय. 

Updated: Jul 18, 2017, 09:22 PM IST
जयप्रभा स्टुडिओ : लता मंगेशकर यांनी याचिका घेतली मागे title=

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका या स्टुडिओच्या मालक प्रसिद्धी पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी  मागे घेतली आहे. त्यामुळे वादावर पडदा पडलाय. 

चित्रपटनिर्मितीची अस्मिता अशी ओळख जयप्रभा स्टुडियोची आहे. जयप्रभा स्टुडिओ हा हेरिटेज वास्तू यादीत समावेश करण्यात आलाय. या समावेश यादी विरोधात सर्वोच्च न्यायालयात लता मंगेशकर यांनी एक याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी आता मागे घेतली आहे.

कोल्हापूर महापालिकेने जिल्ह्यातील ज्या ७७ वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट केल्या होत्या. त्यामध्ये जयप्रभा स्टुडियोचा समावेश होता. मात्र जयप्रभा स्टुडिओची सध्याची साडेतीन एकर जागा व्यक्तीगत मालकीची असल्यामुळे ती परस्पर हेरिटेज वास्तूच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही, या मुद्द्यावर लता मंगेशकर यांनी याचिका दाखल केली होती. 
लता मंगेशकर यांनीच ही या​चिका मागे घेतल्यामुळे जयप्रभा स्टु​डिओची जागा कोणत्याही विकासकाला विकता येणार नाही. भविष्यात याठिकाणी चित्रपटनिर्मिती होण्याचा मार्ग मोकळा झालाय.