भाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 16, 2024, 12:43 PM IST
भाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप title=

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

यावेळी ते म्हणाले की, भाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरील काळी रेघ आहे. असं जयंत पाटील म्हणाले. 

महाराष्ट्रात हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगवेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या एक दोन आमदारांनी या जमिनी लुटल्या. जमिनी काढल्या आणि आपल्या नावावर केल्या. महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं दोन महिन्यात आपण चौकशी करु. 

दोन महिने नाही तर दोन वर्षे झाली तर अजून चौकशी झाली नाही. 13 तारखेला महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये यावर निर्णय झाला.  5 टक्के नजराना भरून या जमिनी वर्ग 2 च्या 1 करा. मात्र, या जमिनी त्यांनी विकल्या आहेत. त्यावर आता इमारती उभ्या झाल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप भाजप सरकारने केलं आहे. 

महाराष्ट्र सरकार हे घाबरलेले सरकार 

महाविकास आघाडीच्या मेळ्याव्यात जयंत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला निवडणुकीची भीती आहे. हे सरकार घाबरलेले सरकार आहे. दोन वर्षांत त्यांनी जसे काम केले आहे, त्यामुळे ते खूपच धास्तावले आहेत. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक ऑक्टोंबरमध्ये घेण्याचे धाडस करणार नाहीत. या निवडणुका दिवाळी झाल्यानंतरच घेणार आहेत. भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र, ते 240 जागांवर थांबले. त्यानंतर बिहार आणि आंध्र प्रदेशाचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार बनवले. परंतु ते पलटी मारणारे लोक आहेत. दिल्लीमधील भाजपचे सरकार कधी खाली येईल, याचा काही नेम नाही. असं जयंत पाटील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले.