ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी आरोप फेटाळताना सांगितलं...

ह.भ.प. निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला नोटीस देण्यात आली आहे,

Updated: Feb 20, 2020, 05:02 PM IST
ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी आरोप फेटाळताना सांगितलं... title=

अहमदनगर : ह.भ.प. निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला नोटीस देण्यात आली आहे, नोटीसमध्ये नमूद केलेल्या तारखेला आपण संबंधित ठिकाणी त्या तारखेला कीर्तन केलं नसल्याचं इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या दिलेल्या उत्तरावर PCPNDT समिती समाधानी असल्याचं इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. PCPNDT समितीने माध्यमाच्या आधारे नोटीस दिली होती.

PCPNDT समिती त्या माध्यमांकडून बातमीच्या आधाराबाबत खुलासा मागवणार असल्याचंही कळतंय. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं आहे.

या वक्तव्यावर इंदुरीकर महाराज यांनी यापूर्वीच माफी मागितलेली आहे, तरी देखील भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी, महाराजांनी माफी मागितली असली, तरी त्यांनी अनेकवेळा महिलांच्या त्यांच्या कीर्तनातून अपमान केला असल्याचं म्हटलं आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या तोंडाला काळं फासू असा दावा तृप्ती देसाई यांनी केल्यानंतर, इंदुरीकर समर्थकांनी देखील असं करूनच दाखवा असं आवाहन देत, आता हे जरा जास्तच होत आहे. आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं असल्याचं म्हटलं आहे.