मोठी बातमी! हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? 'हे' आहे कारण

हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची सूत्रांची माहिती

Updated: Oct 22, 2021, 07:11 PM IST
मोठी बातमी! हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? 'हे' आहे कारण title=

अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडणार (Guardian Minister) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्याला पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं अशी मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे. दोन वर्षांसाठीच पालकमंत्रीपद घेणार असल्याचं आपण पक्षाला सांगितलं होतं. याच कारणासाठी पालकमंत्रीपद सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अहमदनगरच्या पालकमंत्रिपदावर हसन मुश्रिफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

किरीट सोमय्या यांचे आरोप

पालकमंत्रीपद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांनी कारण दिलं असलं तरी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांना पद सोडावं लागत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ सातत्याने चर्चेत होते. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या संदर्भात 2700 पानाचे पुरावे त्यांनी दिले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे पुरावे सोमय्या यांनी आयकर विभागाला सोपवले आहेत.