क्षुल्लक कारणावर वसईत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, मारहाणीचा VIDEO कॅमेरात कैद

वसई पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Updated: Feb 17, 2022, 02:34 PM IST
क्षुल्लक कारणावर वसईत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, मारहाणीचा VIDEO कॅमेरात कैद title=

वसई : वसईच्या गिरीज गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडलीय.  या संपूर्ण मारहाणीचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  बावखल बुजविण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. 

गिरीज इथं खाजगी जागेत स्रिमीता डिसील्वा हे मातीभारावं करत असताना आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी त्याला विरोध केला व त्यांचे फोटो काढले. यावरून डिसिल्व्हा कुटुंबीयांनी सांबरे यांना मारहाण केली.

मारहाण झालेल्या संतापलेल्या सांबरे यांनी आपले साथीदार बोलावले. त्यानंतर त्यांनी मिळून डिसिल्व्हा यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. 

वसई पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.