नवाब म्हणतात; बोललो नाही आणि बोलणारही नाही

मंत्री नवाब मलिक यांनी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावत आपले स्पष्टीकरण दिले आहे.

Updated: Feb 17, 2022, 01:48 PM IST
नवाब म्हणतात; बोललो नाही आणि बोलणारही नाही  title=

मुंबई : सचिन वाझे आणि परमबीर सिग हेच स्फोटके असलेल्या कारचे जवाबदार आहेत. त्यांना एनआयए वाचवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिक यांच्या या आरोपामुळे चांदीवाल आयोगाने त्यांना समन्स बजावत आज आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज मंत्री मलिक यांनी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. नवाब मलिक यांच्यातर्फे ऍड. मोबीन सोलकर यांनी आयोगासमोर बाजू मांडली.

मलिक यांनी जे काही विधान केले ते एनआयएच्या चार्ज शीटच्या आधारावर केले होते असे यावेळी ऍड. मोबीन सोलकर यांनी आयोगाला सांगितले. तर, नवाब मलिक यांनी मी आयोगाबद्दल काही बोललो नाही आणि यापुढे बोलणार नाही असे स्पष्टीकरण दिले. 

नवाब मलिक यांच्या या स्पष्टीकरणानंतर चांदीवाल आयोगाने त्यांना दिलेली नोटीस रद्द केली. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी सचिन वाजे यांना तळोजा जेल येथून चांदीवाल आयोग सुनावणीसाठी आणण्यात आले आहे.