नागपूरमध्ये फ्रेंडशिपच्या नावाखाली लोकांना गंडा घालणारी टोळी जेरबंद

फ्रेंडशिपच्या नावाखाली भलत्या सलत्या लोकांशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण...

Updated: Aug 22, 2018, 07:31 PM IST
नागपूरमध्ये फ्रेंडशिपच्या नावाखाली लोकांना गंडा घालणारी टोळी जेरबंद title=

नागपूर : फ्रेंडशिपच्या नावाखाली भलत्या सलत्या लोकांशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका, आम्ही हे का सांगतोय, त्यासाठी वाचा ही नागपुरातली रिअर स्टोरी. हायप्रोफाईल महिलांशी मैत्री करा आणि हजारो रुपये कमवा अशा जाहिराती निशा फ्रेंडशिप क्लबच्या नावानं वृत्तपत्रात यायच्या. या जाहिरातींना बळी पडत नागपुरातल्या अनेकांनी लाखो रुपये गमावले. अखेर या टोळीचा म्होरक्या रितेश बैरवा ला नागपूर पोलिसांनी ठाण्यातून तर टोळीतल्या ४ महिलांना नवी मुंबई आणि ठाण्यातून अटक केलीय.  

उच्चशिक्षित महिला, महाविद्यालयीन तरुणींबरोबर  मैत्री करा आणि २० हजार कमवा अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीत असायचा. फ्रेंडशिप क्लबचा सदस्य होण्यासाठी पैसे उकळले जायचे. त्यासाठी या टोळीनं पुण्यात विविध बँकात चार महिलांच्या नावे २८ खाती उघडली होती. या खात्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगण्यात यायचं. अशी सात खाती पोलिसांनी सील केलीयत. गेल्या ६ -७ वर्षांपासून ही टोळी लोकांना लुटत होती. पण बदनामीच्या भीतीनं अनेक जण तक्रार करायला पुढेच आले नाहीत. पण एक तरुण पुढे आला आणि या टोळीचा पर्दाफाश झाला.