मुंबई : पंधरा फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला आपण उपस्थित होतात. त्या पत्रकार परिषदेत आमचे मित्र संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली होती. जो घाम फुटला होता, तो विरोधकांनी फोडला होता, की चुकीच्या कामामुळे, कृत्यामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, ते सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे, असे मुंबईच्या भाजप कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राऊत म्हणतात, मी कोणाला घाबरत नाही, मर्दांची शिवसेना आहे, मर्दाला मर्द सांगण्याची आवश्यकता भासत नाही. ती पत्रकार परिषद कोणावर आरोप करायला घेतली होती? राज्यभरातील शिवसैनिक येणार, नेते येणार, मंत्री येणार, पण साधे विभागप्रमुख पण आले नाहीत. शिवाजी पार्कच्या विभागप्रमुख, मुंबईचे विभागप्रमुखही आले नाहीत.
नेते नाहीत, मंत्री नाहीत, पक्षाचे प्रमुखही नाहीत. नाशिकची काही मोजकी लोकं होती. कारण ते संपर्क प्रमुख आहेत. आता शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून पत्रकार परिषद घेतली. एवढी दिवस सेनाभवन आठवलं नाही, काही शाल बिल घेऊन, जसं काय सेनाप्रमुख हेच झाले आहेत, अशा आवेशात बसून पत्रकार परिषद घेतली.
त्या पत्रकार परिषदेत काय काय शब्द वापरले, आम्ही गांडुळ नाही, आम्ही कुठे म्हणतोय, तुच तर म्हणतोयस असं, याचा अर्थ काय? शिवसेना, बाळासाहेब यांचे मला आशिर्वाद आहेत. हा माणूस शिवसेनेत आला कधी? २ मे १९९२ सामनामध्ये संपादक म्हणून आला.
त्या आधी लोकप्रभात होता, त्याआधी मार्मिकमध्ये होता. मार्मिकमधून हकालपट्टी झाली आणि लोकप्रभात आले. लोकप्रभात असताना त्यांनी जे काय पराक्रम केले, तर त्यांनी त्यावेळेत लोकप्रभात असताना बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख केले. १० मे १९९२ चा अंक आहे, त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे काय लिहिलं आहे, काही कौटुंबिक प्रश्न विचारले आणि ते त्यांनी लोकप्रभामध्ये छापले.
बाळासाहेबांनी हा पत्रकार कसा आहे हे पत्रकारांसमोर सांगितलं. हा पत्रकार नेत्या नेत्यांमध्ये कशी अंतर्गत आग लावतो. त्याच प्रवृ्त्तीने तुम्ही लिहित असता म्हणून मी चिडतो, असं बाळासाहेब यांनी म्हटलं होतं. तुम्ही लाचार पत्रकार शरद पवारांना मुजरा करता आणि माझ्याकडे सत्ता आली तर मला मुजरा कराल, हे राऊत यांना उ्ददेशून बाळासाहेबांनी म्हटलं आहे.