'राज्यपालांनी अंत पाहू नये', अजित पवारांचा राज्यपालांना इशारा

महाराष्ट्रातील राजकारणात नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली. तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना इशारा दिला आहे. 

Updated: Feb 5, 2021, 06:34 PM IST
'राज्यपालांनी अंत पाहू नये', अजित पवारांचा राज्यपालांना इशारा title=

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली. तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना इशारा दिला आहे. 
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला. राज्यपालांनी आपला अंत पाहू नये अशा शब्दात अजित पवारांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिले आहे. तसंच 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेलं आहे असा टोलाही त्यांनी बोलताना लगावला. आपण याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

दुसरीकडे राज्यातील काँग्रेसच्या गोटात मोठा बदल
काँग्रेसनं नाना पटोलेंच्या नेतृत्वात राज्यात नव्या टीमची घोषणा केली. नाना पटोले यांच्या नावाची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राज्यात विभागनिहाय सहा कार्याध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे. 

कार्याध्यक्षपदावर विदर्भातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मराठवाड्यातून बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे, उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील, मुंबईतून नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.