चहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल

Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 15, 2023, 07:44 PM IST
चहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल title=
Dead lizard Found in bread or pav video viral on Social media Thane bhiwandi news

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पाव हा आजच्या जीवनशैलीमधील एक भाग आहे. सकाळच्या नाश्ताची सुरुवात असो किंवा जेवण पावाचा त्यात समावेश असतो. चहा पाव, वडा पाव, भजी पाव, समोसा पाव, मस्का पाव, अगदी नॉनव्हेजसोबतही अनेक जण पाव खातात. खरं तर इथे पावाशिवाय आपला आहार अधूरा आहे असं म्हटलं वावगं ठरणार आहे. एवढ्या महत्त्वाचा पाव असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेकरीतून घरी विकत घेतलेल्या नरम पावात मेलेली पाल (Dead lizard in bread) आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. (Dead lizard Found in bread or pav video viral on Social media Thane bhiwandi news )

भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम यांनी सकाळी 8 वाजता कोहिनूर स्वीट दुकानातून पाव विकत घेतला. घरी आल्यावर कुटुंबासोबत नाश्तासाठी ते बसले आणि पाव खाण्यासाठी हातात घेताच त्या नरम पावात मेलेली पाल आढळली. कुटुंबांना हे पाहून धक्काच बसला. वेळीच पावातील पाल दिसल्याने मोठा अनर्थ टळला. 

lizard

या घटनेनंतर त्यांनी तातडीने दुकान गाठलं. दुकानदाराला पावात मेलेली पाल आढळल्याचं दाखवलं. मात्र त्यावेळी दुकानाचा मालक तिथे नसल्याने काय करावं कोणाला समजतं नव्हतं. अशातच सलीम यांनी या घटनेचा आणि मेलेली पाल असलेल्या नरम पावाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर मालक समोर आला आणि त्याने स्पष्टीकरण दिलं. आम्ही पाव नारपोली हद्दीत असलेल्या नेशनल बेकरीतून होलसेल दरात पाव विकत घेतो. त्यामुळे या घटनेत आमची चूक नाही, असं म्हणत त्यांनी हात झटके. 
 
ही घटना पहिलीच नसून यापूर्वीही ब्रेड असो किंवा पाल यात काही ना काही आढळलं आहे. त्यामुळे पाव प्रेमी पाव विकत घेताना सावधगिरी बाळगा. त्यात पाल किंवा झुरळ अशा प्रकारचे जीव अथवा अन्य काही नाही ना ते तपासून घ्या.