नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा (Coronavirus)संसर्ग देशभरात वाढत आहे, आता कोरोनाच्या विळख्यात छत्तीसगडमधील नक्षलवादी अडकले आहेत. दंतेवाडा एसपी अभिषेक पल्लव यांनी या संदर्भात माहिती दिली. दक्षिण बस्तरच्या जंगलात अन्न विषबाधा आणि कोरोना संसर्गामुळे (Coronavirus in Naxal Camp)10 हून अधिक नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दक्षिण बस्तरच्या (Coronavirus in Bastar) जंगलात बस्तरमधील कोरोनाव्हायरसची स्थिती भयानक आहे. येथे 100 हून अधिक छोट्या-मोठ्या केडर नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झालीय असा दावा दंतेवाडाचे एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी केलाय.
बस्तरचे महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले, 'सरकार नक्षलवाद्यांच्या उपचारासाठी डॉक्टर पाठवू शकत नाही.नक्षलवादी बंदुकीने सरकारशी लढा देत आहेत. जखमी नक्षलवाद्यांनाही पोलीस उपचार देतात. त्यांनी शरण गेल्यास त्यांच्यावर उपचार केले जातील. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
छत्तीसगडमध्ये सध्या 1.25 लाख एक्टीव्ह केसेस आहेत. छत्तीसगड आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 11867 लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या आता 8,63,343 वर गेली आहे. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 8 लाख 63 हजार 343 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यापैकी 7 लाख 27 हजार 497 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 104 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विषाणूची लागण झालेल्या 10 हजार 742 लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.