Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपटेड; मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांची गुप्त कारवाई

सैफवर हल्ला करणा-या संशयित आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारावई केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 18, 2025, 05:47 PM IST
Saif Ali Khan Attack :  सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपटेड; मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांची गुप्त कारवाई title=

Saif Ali Khan Attack :   अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्करणात पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले असले तरी खऱ्या आरोपीची ओळख पटलेली नाही. अशातच मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांनी एक धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या सविस्तर तपशील समोर आलेला नसला तरी पोलिसांनी आणकी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

16 जानेवारीच्या मध्य रात्री अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. वांद्रे येथील घरात घुसून हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. यात सैफ गंभीर जखमी झाला.  अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करणा-याची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोरांच्या तपासासाठी 20 पथकं तयार करण्यात आले असून सर्व बाजूनं तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तपासात मोठी अपडेट समोर आली. सैफ अली खान प्रकरणात मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईपासून 1095 Km अंतरावर हे लोकेश आहे. 

दरम्यान, सैफवर हल्ल्या केल्यानंतर संशयित 7 ते 8 तास नंतर हल्लेखोर दादर च्या रस्त्यांवर मोकाट फिरत होता..दादर मशील विविध रस्त्यांवर असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये त्याला टिपण्यात आलंय. जेव्हा तो वांद्रे येथून निघाला तेव्हा लाल शर्ट होता आणि दादरला पोहोचला तेव्हा निळा शर्ट.  त्याने एका दुकानातून हेडफोन खरेदी केले.

सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यातील आरोपीला शोधण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाहीये. मुंबई पोलिसांकडून काल अनेक संशयितांची चौकशी करण्यात आलीय. सैफ अली खानच्या वांद्रायातील घरासमोर रात्री उशिरा सुरू असलेल्या दुकान मालकांचीही पोलिसांनी चौकशी केलीय. 15 पेक्षा अधिक लोकांची मुंबई पोलिसांनी चौकशी केलीय. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्याची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करताहेत. रात्री फिरणा-या लोकांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलीय.