विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : संपूर्ण राज्याला हादलवणाऱ्या प्रकरणात आता नवी बातमी समोर आली असून, या हत्येचं भिवंडी कनेक्शनही हादरवणारं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. (Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case)
6 डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या आवारात मारहाणीची घटना घडली.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्या जवळून अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर अपहरणाचा, हत्येचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला.
10 डिसेंबर रोजी पुरवणी जबाबात सात आरोपींची नावे घेण्यात आली. यात. 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे 5)सुदर्शन घुले 6)सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. .. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड त्यालाही अटक करण्यात आली.