'बरं झालं मी शून्य होण्याआधी....', शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांचं मोठं विधान, 'मजबुरी...'

Babajani Durrani joins NCP: संभाजीनगरमध्ये आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादीत दोन गट झाल्यावर बाबाजानी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) त्यांच्या गटात गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर पुन्हा ते शरद पवार गटात परत आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 27, 2024, 05:25 PM IST
'बरं झालं मी शून्य होण्याआधी....', शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांचं मोठं विधान, 'मजबुरी...' title=

Babajani Durrani joins NCP: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) मोठा धक्का बसला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar Group) गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी शरद पवार गटात (Sharad Pawar Group) जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान पक्षप्रवेशानंतर केलेल्या भाषणात त्यांनी बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो असं उपहासात्कमपणे म्हटलं. 

कूछ तो मजबूरी होती है, वरणा कोई बेवफा नाही होता असं सांगत बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या अप्रत्यक्षपणे अजित पवारांसोबत जाण्यामागील कारण सांगितलं. साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो असंही यावेळी ते उपहासात्मकपणे म्हणाले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत मोदी सरकारवर टीका केली. शत्रू हुशार आहे, तुम्हाला सहकार्य देऊन मारेल असं ते म्हणाले. 

"लोकसभा निवडणुकीत देशातील चित्र पाहिलं. जे पक्ष, लोक भाजपा आणि जातीयवाद कऱणाऱ्या पक्षांसह केलं त्यांना लोकांनी शून्य केलं. पुलवामाच्या आधारे यांचं सरकार आलं होतं. पण गेल्या 10 वर्षात देशात जातीयवाद, धर्मवाद पसरवला. शोभत नाहीत अशी भाषणं पंतप्रधान, मुख्यमंत्री करत आहेत. अल्पसंख्यांक मुस्लीम समाज फार अपेक्षेने पाहत आहे. शरद पवार यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं जात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे," असं बाबाजानी दुर्राणी म्हणाले. 

मलादेखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणुक भाजपविरोधात लोकांनी हातात निवडणूक घेतली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली असा गौप्यस्फोट बाबाजानी दुर्राणी यांनी केला. 

दरम्यान शऱद पवारांनी यावेळी आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात आहे. 10 वर्षात  आपण पाहिलं. यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात यांचा थोडाही वाटा नाही. गेल्या निवडणुकीत मोदींनी काय केले? या देशाच्या संविधानावर हल्ला करण्याचं काम त्यानी केलं. समाज एकसंघ राहिला पाहीजे हे सूत्र त्यांना मान्य नाही. त्यामुळे यांचा हातात सत्ता हे मान्य नाही असं शरद पवार म्हणाले. 

पक्ष प्रवेश होताना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका. पण मला माहित आहे आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, तो सर्व आंबे खराब करतोय त्यामुळे आडी पुन्हा खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईन असंही ते म्हणाले.