दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे एकाच दिवशी बर्थडे सेलिब्रेशन, 'या' ठिकाणी देणार आमदारांना पार्टी

Ajit Pawar and Devendra Fadnvis Birthday: भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री बनले. योगायोग म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आणि आता सत्तेत एकत्र आल्यानंतर दोघेही एकत्र वाढदिवसाचा जल्लोष करणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 19, 2023, 11:48 AM IST
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे एकाच दिवशी बर्थडे सेलिब्रेशन, 'या' ठिकाणी देणार आमदारांना पार्टी title=

Ajit Pawar and Devendra Fadnvis Birthday Celebration: भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री बनले. योगायोग म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आणि आता सत्तेत एकत्र आल्यानंतर दोघेही एकत्र वाढदिवसाचा जल्लोष करणार आहेत. 

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष जरी वेगळे असले तरी त्यांच्यात चांगले मैत्रिचे नाते आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे दोघांची मैत्री जगासमोर आली होती. दरम्यान दोघांनीही सत्तेत एकत्र येऊन दाखवले. आता दोघेही सत्तांतर नाट्यानंतर एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत.
त्यामुळे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच दिवशी, एकाच ठिकाणी वाढदिवस साजरा करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे सर्व सत्ताधारी आमदारांना या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

उद्या  20 जून रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीचे आमदार यांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळणार आहे. 

दोघांनीही वाढदिवसानिमित्त सत्ताधारी गटातील सर्व आमदारांना जेवणासाठी निमंत्रित केले आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी गटातील सर्व आमदार एकत्र येणार आहेत. 

अजित पवार आणि फडणवीस यांचा 22 जुलै वाढदिवस असतो. त्यानिमित्तत महायुतीच्या आमदारांमध्ये संवाद आणि स्नेह वाढवावा  यासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही पार्टी हॉटेल ओबरॉय येथे उद्या संध्याकाळी होणार आहे. 

या पार्टीला अजित पवार समर्थक कोणकोणते आमदार उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.