उल्हासनगर: रस्त्याने जाताना धक्का लागला अन् तरुणाने जीव गमावला, थरार सीसीटीव्हीत कैद, Video

Crime News in Ulhasnagar: रस्त्याने जातांना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ मधील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Updated: Jul 19, 2023, 11:29 AM IST
उल्हासनगर: रस्त्याने जाताना धक्का लागला अन् तरुणाने जीव गमावला, थरार सीसीटीव्हीत कैद, Video  title=
A young man was killed by a group of three in Ulhasnagar crime

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया

Ulhasnagar Crime News: रस्त्याने जाताना धक्का लागला म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरच्या सतरामदास रुग्णालयाजवळ ही घटना घडली आहे. तरुण कुकरेजा असं मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. धक्का लागल्याचा राग मनात धरुन तरुणला आरोपींनी बेदम मारहाण केली होती. त्यातच त्याचा करुण अंत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (Crime News in Ulhasnagar)

तीन दिवसांपूर्वी कॅम्प नंबर ४ च्या सतरामदास हॉस्पिटलमध्ये समोरून जातांना तरुण याचा धक्का आरोपी बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडीया आणि मनीष दुसेजा यांना लागला होता. याचा राग मनात धरून तरुण याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. 

राग मनात धरुन तरुण याला बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी झाला होता. तरुणला सुरूवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्यानंतर के. एम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती तो उपचारास दाद देत नव्हता. त्याचवेळी उपचारादरम्यान तरुणचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी 302 कलमाखाली आरोपी बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडीया आणि मनीष दुसेजा यांच्या विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे आरोपी फरार झाले असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे हे करत आहेत.

खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर जवळील म्हारळगावातील खदानीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय, उमेश सोनवणे असे त्या मृत तरुणाचा नाव आहे , तो याच परिसरातील क्रांतीनगर भागात राहतो. उमेश हा आपल्या ७ ते ८ मित्रांबरोबर काल सायंकाळी चार वाजता म्हारळगावाच्या हद्दीतील खदानी जवळ असलेल्या धबधब्यावर गेला होता. तिथेच खाली असलेल्या खदानमध्ये मी कपडे धुवायला जातो असे सांगून तो खदानीत गेला. मात्र खदानीत पाणी खोल असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.