क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कागल येथे महामार्ग ओलांडणाऱ्या एका महिलेला क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारने धडक दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 15, 2017, 12:48 PM IST
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू title=

कोल्हापूर : कागल येथे महामार्ग ओलांडणाऱ्या एका महिलेला क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारने धडक दिली. या कारच्या धडकेत या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मधुकर रहाणे यांच्यावर कागल पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.

अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कांबळे ( ६५, रा. इचलकरंजी) आहे. कारच्या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्यात. उपचारदरम्यान त्यांचे निधन झाले.शुक्रवारी पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावर मधुकर रहाणे यांच्या कारने या महिलेला धडक दिली.  या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. 

कागल येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. अपघाताच्यावेळी अजिंक्यचे वडिल मधुकर रहाणे हे गाडी चालवत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, कांबळे या इचलकंरजीमधील शहापूर येथील सावित्रीनगर येथे रहात होत्या.