कोठडीच्या छताची कौलं काढून 5 आरोपी पळाले

छताची कौलं काढून 5 आरोपीनी रात्री पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार 

Updated: Feb 10, 2020, 10:14 AM IST
कोठडीच्या छताची कौलं काढून 5 आरोपी पळाले title=

अहमदनगर : अहमदनगरच्या कर्जतमधल्या कोठडीच्या छताची कौलं काढून 5 आरोपीनी रात्री पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले हे आरोपी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पसार झाले. या आरोपींमध्ये खुनातील 3 बलात्कारातील 1 एक आणि चोरीच्या गुन्ह्यातील एक अशा 5 आरोपींचा समावेश आहे.

पोलिसांची धावपळ

कोठडीतून आरोपी पळून गेल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी 7 पथकं तातडीने रवाना करण्यात आली आहेत. 

पहाटेपर्यंत या पथकांना आरोपींचा शोध लागलेला नाही.  

कर्जत शहराच्या मध्यवस्ती असलेल्या त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.