Pune Crime News : पुण्यात कोयता गँगनंतर स्प्रे गँगनं धुमाकूळ घातलाय.. विशेषत शाळकरी मुला-मुलींवर स्प्रेचा फवारा मारत त्यांना त्रास दिला जातोय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द गावात मुलामुलींवर चार अज्ञात इसमांचं टोळकं स्प्रेचा फवारा करतंय. दबा धरुन हे टोळकं शाळकरी मुला-मुलींना त्रास देतं. धक्कादायक म्हणजे या स्प्रेमुळे अंगाला खाज सुटणे, सूज येणे असे प्रकार घडत आहेत.
एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या तोंडावर चार जणांच्या टोळीने स्प्रे मारला. सोबत असलेल्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्यानं अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला. असाच प्रकार इतर विद्यार्थ्यांसोबत घडतोय. त्यामुळे शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांमध्ये या स्प्रे गँगची दहशत आहे.. पोलिसांनी या स्प्रे गँगचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द परिसरात आठवीतील विद्यार्थिनीवर, 4 जणांच्या टोळक्यानं विशिष्ट स्प्रे मारला. त्यामुळे त्या मुलीच्या अंगाला खाज येऊन सूज आली. यातून शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. तर संशयास्पद व्यक्ती आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन मंचर पोलिसांनी केलंय.
पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शहरात गेल्या 7 महिन्यात एकूण 47 जणांचा खून झाला. त्यातच पुन्हा कोयता गँग सक्रिय झाली. एका वर्षात त्यांनी 100 पेक्षाही अधिक हल्ले केलेत. मारामारी, घरफोडीचे प्रकारही सर्रास सुरू आहेत.
पुणे ससून ड्रग्स प्रकरणातील आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे आठवड्याला 50 किलो एमडी ड्रग्स बनवत होते अशी माहिती समोर येत आहे. नाशिक मधील कारखान्यात दर महिन्याला 200 किलो एम डी ड्रग्सचा साठा तयार होत होता. प्रत्येक 50 किलो एम डी ड्रग्स तयार करण्यासाठी एक आठवडा लागत होता. एक किलो एम डी चा बाजार भाव 1 कोटी रुपये आहे.. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे दोघेही मिळून नाशिकमधला कारखाना सांभाळत होते. अभिषेक बलकवडे हा स्वतः केमिकल इंजिनियर असून एम डी ड्रग्स कसे बनवायचे याचे ज्ञान त्याला होते.