'तीन हजार खात्यात आल्यावर लाडक्या बहिणी...' व्हायरल होणाऱ्या मीम्सवर अदिती तटकरेंचं दिलखुलास उत्तर

झी 24 तासच्या 'टू द पाँईट'मध्ये महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या आहेत. त्यांनी लाडक्या बहिणीवर व्हायरल होणाऱ्या मीम्सवर देखील वक्तव्य केलं आहे. काय म्हणाल्या अदिती तटकरे? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 24, 2024, 09:50 PM IST
'तीन हजार खात्यात आल्यावर लाडक्या बहिणी...' व्हायरल होणाऱ्या मीम्सवर अदिती तटकरेंचं दिलखुलास उत्तर title=

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: राज्य सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी सरकारचं बजेटही वाढत जाणार आहे. दरम्यान, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली.

लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री अदिती तटकरेंना काय वाटतं? 

राज्यात अनेक योजना येत आहेत. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' देखील सुरु करण्यात आली आहे. सरकारच्या या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधकांकडून राज्य सरकारच्या या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. निवडणुका समोर ठेऊन ही योजना चालू केल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. परंतु विरोधकच म्हणत आहेत की, जर आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणीला महिन्याला 3 हजार रुपये देऊ असे विरोधक म्हणत आहेत असं अदिती तटकरे म्हणाल्या. 

सुप्रिया सुळेंना सोडून अजित पवारांबरोबर काम करताना कसं वाटतं? 

ज्या वेळी पक्ष एकत्र होता त्यावेळी अजितदादा, सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे देखील होतेच. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन असायचे. मी महाविकास आघाडीच्या काळात देखील सरकारमध्ये काम केलं आहे. कोणतीही अडचण आली तरी आम्ही अजितदादांना संपर्क करायचो. अजितदादांची सुरुवातीपासून काम करण्याची एक पद्धत राहिली आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणेवर असणारा अजितदादांचा प्रभाव. या सर्व गोष्टी तरुण आमदारांना आकर्षित करत असतात असं त्या म्हणाल्या. 

अदिती तटकरे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात का? 

पहिल्या आणि आताच्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. 2014 च्या आधी सोशल मीडिया हा आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्याचा एवढा महत्त्वपूर्ण भाग बनलेला नव्हता. त्यावेळी बऱ्याच जणांना सोशल मीडिया माहिती नव्हते. अनेकदा आपण सोशल मीडियावर आवड आहे म्हणून ते सर्व बघत असतो. मी देखील सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. मी सोशल मीडियावर सर्व कमेंट्स, व्हिडीओ आणि लाईक्स सर्व बघत असते. 

लाडक्या बहीणीवरील मीम्सवर काय म्हणाल्या अदिती तटकरे? 

लाडकी बहीण योजनेवर सोशल मीडियावर कोणत्या मीम्स पाहिल्या असे विचारले असता अदिती तटकरे म्हणाल्या की, अशा तीन बहीणी आहेत. ज्या तिघी मिळून भावाचा सत्कार करत आहेत. कारण त्याने तिघींचे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले म्हणून त्याचा ते शाल आणि नारळ देऊन सत्कार करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या हटके मीम्स सोशल मीडियावर बघायला मिळत असतात. काही वेळेला म्हणजेच आता जे 3 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले त्यावेळी काही महिला बाहेर ट्रीपसाठी फिरायला निघाल्या आहेत. अशा अनेक मीम्स मी पाहत असते. सोशल मीडिया हा तुम्ही अपडेट राहण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे. या मीम्समधूल लोकांच्या मनामध्ये काय चालले आहे. हे सर्व गोष्टी दिसून येत असतात. असं अदिती तटकरे म्हणाल्या.