Priya Berde : राष्ट्रवादीची साथ सोडली; अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Priya Berde Join BJP). दोन वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रेवश केला होता. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. 

Updated: Feb 11, 2023, 06:48 PM IST
Priya Berde : राष्ट्रवादीची साथ सोडली; अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश title=

Priya Berde Join BJP :  अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Priya Berde Join BJP). राष्ट्रवादीची साथ सोडून प्रिया बेर्डे यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपमध्ये प्रवेश घेत प्रिया बेर्डे यांनी आपला नवा राजकीय प्रवास सुरु केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला. 

नाशिकमध्ये भाजप कार्यकारणीच्या कार्यक्रम आयोजीत करम्यात आला होता. या कार्यक्रमातच प्रिया बेर्डे यांनी भाजप पक्षात प्रवेश  केला  आहे. राष्ट्रवादीला राम राम ठोकत प्रिया बेर्डे यांनी भाजपत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे. प्रिया बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केल्याचे समजते. 

2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित पुण्यात प्रिया बेर्डे यांचा पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, अवघ्या दोनच वर्षता प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 

कोण आहेत प्रिया बेर्डे? 

प्रिया बेर्डे या मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत.  प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी दिले. ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात प्रिय बेर्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रिया बेर्डे यांनी कोरोना काळात अनेक कलाकारांना मदतीचा हात दिला होता. कोरोना काळात सिनेसृष्टीतील कलाकारांना केलेल्या मदतीमुळे प्रिया बेर्डे त्यावेळी चर्चेतही आल्या होत्या. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंतर आता त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.