Sangli Crime News : मोबाईलचा स्क्रीन गार्ड हे मोबाईलचा संरक्षण करतो. मात्र, याच मोबाईल स्क्रीनमुळे एकाच जीव गेला आहे. अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड वादातून एका मोबाईल दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्येकांच्या हातातल्या मोबाईलचे संरक्षण करण्यासाठी स्क्रीन गार्ड हे खूप महत्त्वाचं ठरतं. बाजारात हे स्क्रीन गार्ड अगदी स्वस्तात मिळतं पन्नास रुपयांपासून शंभर रुपये इतकी त्याची किंमत आहे. पण ह्याच स्क्रीन गार्ड मुळे एका मोबाईल दुकानदाराला आपला जीव गमवावा लागला आहे. सांगलीतल्या विपुल गोस्वामी या मोबाईल दुकानदाराचा स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देत नसल्याने खून करण्यात आला आहे.
मूळ राजस्थानचा असणाऱ्या विपुल याचे सांगलीच्या एसटी स्टँड नजीक विपुल भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे. या दुकानात मोबाईलचे वेगवेगळे साहित्य विक्री करायचा. याच मोबाईल दुकानात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चार अल्पवयीन तरुण मोबाईलचा स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी पोहोचले. मग चौघांनी मोबाईलचा स्क्रीन गार्डन दाखवण्यासाठी सांगितले. विपुलने मोबाईलचा स्क्रीन गार्ड दाखवले,मात्र स्क्रीन गार्ड किंमत ऐकल्यावर अल्पवयीन तरुणांना हटकले, बाजारात पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड मिळत असताना शंभर रुपये किंमत कशी ? असा सवाल झाला.
नेमका हाच स्क्रीन गार्डचा वाद हत्येची ठिणगी बनली. यातून शिवीगाळ सुरू झाली आणि काही क्षणातच स्क्रीन गार्ड खरेदीसाठी आलेल्या चौघांनी आपल्या जवळ असणारी धारदार शस्त्र काढली आणि मोबाईल दुकानदार असणाऱ्या विपुलवर एका मागून असे वीस ते पंचवीस वार करण्यात आले ज्यामध्ये विपुल गोस्वामी याचा जागीच मृत्यू झाला.
भर दिवसा सांगली शहरात अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून झालेल्या या हत्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस पथकाने ठाव घेत गतीने तपास सुरू केला आणि काही वेळातच या त्या संशयित तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेण्यात आला आहे. मात्र पन्नास रुपयेचा मोबाईल स्क्रीन गार्डमुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला आहे.