नांदेड : कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. दररोज, असंख्य लोकांना संसर्ग होत आहे, त्यामुळे रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बेड्स आणि जागा कमी पडत आहेत. कोणाला बेड्स मिळत नाही तर, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचे प्राण जात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नांदेडमधील डॉक्टरांनी जे काम केले आहे, त्यातून त्यांनी मानवतेचं एक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे.
डॅाक्टरांनी व्हॉट्सग्रुपच्या 50 बेड्सचे रुग्णालय तयार केले आहे. नायगांव हे नांदेड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. या शहराचा एक व्हॉट्स ग्रुप आहे ज्याचे नाव आहे नायगावचा आवाज म्हणजे voice of naygav या ग्रुपमध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यापारी, पत्रकार, राजकारणी, पोलिस यांसारखे अनेक पेशांमधील लोकं एकमेकांशी जोडले गेले आहेत. नांदेड जिल्हात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळत आहेत. दररोज हजारो लोकांना संसर्ग होत आहे आणि मृतांचा आकडा वाढत आहे.
अशा परिस्थितीत या व्हॉट्स ग्रुपच्या लोकांनी पुढाकार घेतला. या ग्रुपचे अॅडमीन नागेश कल्याण यांनी ही कल्पना मांडली आणि ग्रुपमधील सामाजिक जबाबदारी खाली नायंगावमधील लोकांसाठी खासगी कोविड सेंटर तयार करण्याचा प्रस्ताव दिला. त्यांना खात्री होती की, ग्रुपमधील सदस्यांना हा प्रस्ताव आवडेल आणि ते मदतीसाठी पुढे येतील.
या प्रस्तावानंतर डॉक्टरांची टीम विनामूल्य सेवा देण्यासाठी पुढे आली. काहींनी रोख रक्कम दिली तर, काहींनी औषधे दिली. ही बातमी संपूर्ण शहरात पसरली, त्यानंतर आणखी लोक मदतीसाठी पुढे आले. या कोविड रुग्णालयाच्या बांधकामासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनीही त्यांची शानदार इंग्रजी शाळा उपलब्ध करुन दिली.
यानंतर या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परवानगी घेऊन कोविड केंद्राचे उद्घाटन केले. या कोविड सेंटरमध्ये 50 बेड बसविण्यात आले. अत्यावश्यक औषधांबरोबरच, अति गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर आणि एक रुग्णवाहिका देखील तैनात केली आहे. ही रुग्णवाहिका 24 तास सेवेत राहते.