टेम्पोच्या धडकेत १२ वर्षाच्या रुक्सानाचा मृत्यू

नाशिकमध्ये १२ वर्षाच्या मुलीला टेम्पोने धडक मारल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. रुक्साना कासीम अन्सारी असे या मृत मुलीचे नाव आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 4, 2018, 02:40 PM IST
टेम्पोच्या धडकेत १२ वर्षाच्या रुक्सानाचा मृत्यू  title=

नाशिक : नाशिकमध्ये १२ वर्षाच्या मुलीला टेम्पोने धडक मारल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. रुक्साना कासीम अन्सारी असे या मृत मुलीचे नाव आहे.

रस्ता क्रॉस करताना धडक 

 नाशिकच्या सातपूर मनपा कार्यलयासमोर हा अपघात झाला. रुक्साना ही रस्ता क्रॉस करत असताना समोरुन आलेल्या टेम्पोने तिला धडक दिली. अपघातानंतर तात्काळ रुक्सानाला  जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. 

रुक्सानाचा मृत्यू 

 पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.