लातूरमध्ये एसटीला अपघात, १४ जखमी

लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा महामार्गावर उमरगा-लातूर या एसटीला झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झालेत. औसा ते लामजना पाटी दरम्यान असलेल्या फत्तेपुर पाटीजवळ हा अपघात झाला. 

Updated: Mar 4, 2018, 01:20 PM IST
लातूरमध्ये एसटीला अपघात, १४ जखमी title=

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा महामार्गावर उमरगा-लातूर या एसटीला झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झालेत. औसा ते लामजना पाटी दरम्यान असलेल्या फत्तेपुर पाटीजवळ हा अपघात झाला. 

भरधाव वेगात निलंग्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोची आणि एस.टी. बसची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार बस ड्रायव्हरने टेम्पो भरधाव वेगात येत असल्याचे पाहून बस ही थांबवली. मात्र आयशर टेम्पोचालक दारुच्या नशेत असल्यानं त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो थेट एसटीवर येऊन आदळला. 

ही धडक इतकी भीषण होती की बसमधील पन्नास पैकी चौदा प्रवासी गंभीर तर काही किरकोळ जखमी झालेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदैवाने यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.