दूध प्यायल्याने आपल्या शरीरराला अनेक फायदे होतात. दूधातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते, जे आपल्या हाडांना मजबूत बनवण्यास मदत करते. याशिवाय दूधातून मिळणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहिती आहे का? दुधासोबत तुम्ही काही पदार्थ खाल्यास त्याचा तुमच्यावर विपरित परिणाम होऊन. तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ?
आंबट फळे
दुधासोबत जर तुम्ही आंबट फळांचे सेवन करत असाल तर सावधान. आंबट फळांमध्ये अॅसिड असते. हे अॅसिड दुधात मिसळ्यास शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.
मासे
मासे खाल्यानंतर किंवा खाण्याआधी दुध पिणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या दोन गोष्टी एकत्र प्यायल्यास शरीरात एक विषारी पदार्थ तयार होऊन तुम्हाला त्वचा आणि पचना संबंधित आजार होऊ शकतात.
मीठ
दुधासोबत मीठाचे सेवन केल्यास तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस, अॅसिडीटी, अपचन असे पचना संबंधित आजार होऊ शकतात.
दही
दुध आणि दह्याचे एकत्रित सेवन केल्यास गॅस, अॅसिडीटी असे पचना संबंधित त्रास होऊ शकतात.
मशरूम
मशरूम खाण्यापूर्वी किंवा खाल्यानंतर दूध पिणे टाळावे. कारण मशरूम आणि दूध या दोघांमध्ये प्रोटीन असते. हे दोन पदार्थ एकत्र पोटात गेल्यास पचन संस्थेवर ताण येऊ शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)