भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा...

Tamil Nadu Artifacts: पुरातत्त्व विभागाला तामिळनाडूतून अशा काही गोष्टी सापडल्या आहेत ज्यामुळं सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृतीचा उलगडा होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 7, 2025, 09:09 AM IST
भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा...  title=
Indus Valley Civilisation Like Artifacts Discovered In Tamil Nadu might be More Than 3200 Years Old read details

Tamil Nadu Artifacts: हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असणारी मानवी संस्कृती नेमकी कशी होती, या संस्कृतीची वैशिष्ट्य नेमकी काय होती इथपासून या संस्कृतीचे अनेक पुरावे मागील काही वर्षांमध्ये झालेल्या उत्खननातून समोर आले. त्यातच आता आणखी काही पुराव्यांची भर पडली आहे. जिथं, सिंधुच्या खोऱ्याच असणाऱ्या संस्कृतीसंदर्भातील अनेक धागेदोरे हाती लागले असल्याचा तर्क वर्तवला जात आहे.

तामिळनाडू पुरातत्वं विभागानं केलेल्या एका निरीक्षणपर अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास 90 टक्के भित्तीचित्र सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृतीशी मिळतीजुळती आहेत. यासंशोधनामुळं भारतातील गतकाळातील इतिहासाची उकल आणखी सखोल पद्धतीनं होत आहे हेच म्हणावं लागेल. 

तामिळनाडूच्या तुत्तुक्कुडी जिल्ह्यातील शिवगलाई इथं हे खोदकाम करण्यात आलंय जिथं उत्खननातून 700 हून अधिक असामान्य कलाकृती समोर आल्या. यामध्ये गोमेद, काळ्या आणि लाल रंगांची भांडी, मातीपासून तयार करण्यात आलेलं सूत कातण्याचं उपकरण, इंद्रगोप मनका, काचेच्या बांगड्या, शंख अशा गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या उत्खननामध्ये जमिनीत पुरले गेलेले 120 कलश सापडले असून, यामध्ये धान्याचा भुसा सापडला असून, कार्बन डेटिंगच्या माध्यमातून हे सर्व पुरावे साधारण 3200 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा : कोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा 

पुरावे आणि सिंधू संस्कृतीतील साम्य... 

सदर उत्खननातून करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार 140 पुरातत्वं क्षेत्रांतून मिळालेल्या 15500 भित्तीचित्रयुक्त भांड्यांचं डिजिटलीकरण करण्यात आलं. यामध्ये तुलनात्मक निरीक्षणातून असे संकेत मिळत आहेत की, सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृती आणि दक्षिण भारतातील लोहयुगीन वस्त्यांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण झाली असाली. हे पुरावे पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरीही शोध मात्र त्याच दिशेनं खुणावतो आहे. 

शिवगलाई इथं सापडलेल्या वस्तू आणि त्यातून केल्या जाणाऱ्या विश्लेषणानुसार ही संस्कृती अत्यंत प्राचीन असण्यासोबतच त्यामध्ये उन्नत तंत्रज्ञान आणि कलात्मक विकासही जोडला गेला होता. शिवाय या संस्कृतीचा इतर संस्कृतींशी संवादपर संबंधही येत होता.