आजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती

आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता. 

Updated: Jul 30, 2022, 12:48 PM IST
आजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती title=

National Pension Scheme : तुम्हाला वाटतं की तुमची पत्नी ही स्वावलंबी बनावी आणि तिला पैसासाठी चणचण भासू नये. तर आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कसं शक्य आहे. तर त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेतर्गंत तुमची पत्नी तुमच्या अनुपस्थितीतसुद्धा घराचे उत्पन्न नियमित खर्च करु शकते. यासाठी तुम्ही आज तुमच्या पत्नीसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) गुंतवणूक करा.

पत्नीसाठी उघडा नवीन पेन्शन खातं

आता तुम्ही तुमच्या पत्नीसाठी तिच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खातं उघडू शकता. या खात्यातर्गंत तुमच्या पत्नीला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर एक रक्कम देण्यात येईल. त्याशिवाय पत्नीला प्रत्येक महिने एक नियमित पेन्शन मिळेल. त्याशिवाय NPS खात्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पैसे मिळायला पाहिजे हे ठरवू शकता. या पेन्शनमुळे वयाच्या 60 नंतरही तुमच्या पत्नीला पैशासाठी कोणावरही अवलंबून राहवं लागणार नाही. NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. 

कशी करायची गुंतवणूक?

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक नवीन पेन्शन सिस्टम खात्यात हवे तेवढे पैसे जमा करु शकता. हे खातं तुम्ही हजार रुपयांपर्यंत उघडू शकता. हे खातं तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्योर होणार. अजून एक महत्त्वाचं नवीन नियमांनुसार, तुम्ही पत्नीच्या वय 65 वर्षे होईपर्यंत हे खातं चालवू शकता.

45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न

या योजनेबद्दल सविस्त समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही NPS खात्यात दर महिने 5 हजार जमा केले आहेत. तर या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 10 टक्के परतावा मिळेल. म्हणजे तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये जमा होणार. या रक्कमेतून त्यांना 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दर महिन्या 54 हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचं वैशिष्ट्यं म्हणजे ही पेन्शन त्यांना आयुष्यभर मिळत राहणार.

 

पेन्शन किती मिळेल?

वय - 30 वर्षे
एकूण गुंतवणूक कालावधी- 30 वर्षे
मासिक योगदान – रु 5,000
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा - 10%
एकूण पेन्शन फंड - रु 1,11,98,471 (रक्कम मुदतपूर्तीवर काढता येईल)
अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम - रु 44,79,388
अंदाजे वार्षिकी दर 8% - रु. 67,19,083
मासिक पेन्शन- 44,793 रुपये

गुंतवणूक सुरक्षित आहे का?

हो, तुम्ही केलेली  NPS मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे.  कारण या योजनेत गुंतवलेले पैसे हे व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जाते. तर केंद्र सरकारने व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना या योजनेची जबाबदारी दिली आहे. NPSने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे, अशी माहिती वित्तीय नियोजकांनी दिला आहे.