Indian Railways:आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेने केली मोठी

रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

Updated: Jul 29, 2022, 10:50 PM IST
Indian Railways:आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेने केली मोठी  title=

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोठा निर्णय घेत भारतीय रेल्वेने (Indian Railways) पुन्हा एकदा पॅसेंजर (Passenger Trains) आणि मेल एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा आदेश जारी केला आहे. या आठवड्यापासून कोरोनाच्या (Corona) काळात बंद असलेल्या सर्व गाड्या सुरू होतील. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या सुमारे 500 पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे 100 मेल एक्स्प्रेस गाड्याही रुळावर धावू लागतील. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून कन्फर्म तिकीट मिळू शकते.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनमध्ये अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोविडचे सावट हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर सरकारने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी काही प्रमाणात गाड्या प्रवास करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा पॅसेंजर गाड्या सुरु करुन रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या आधी जवळपास 2800 पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. तर आता 2300 पॅसेंजर ट्रेन धावत आहेत. याशिवाय 1770 मेल एक्स्प्रेस गाड्या सध्या धावत आहेत आणि एका आठवड्यात 1900 हून अधिक मेल एक्सप्रेस गाड्या धावू लागतील. त्यामुळे कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार कोविड दरम्यान रेल्वेने पॅसेंजर गाड्या थांबवल्या होत्या, मात्र रिकामे असलेल्या ट्रॅकच्या देखभालीचे काम वेगात करण्यात आले होते. संपूर्ण कोविड कालावधीत, रेल्वेने देशभरात ट्रॅक देखभालीचे जबरदस्त काम केले.  कोविडचा वेग मंदावल्यानंतर  रेल्वेने देशभरात सर्व सेवा पूर्ण क्षमतेने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.