देशात हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे देशात 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिनेच आता विकता येतील. हॉलमार्क अनिवार्य करण्याच निर्णय 2019 मध्येच घेण्यात आला होता. 15 जानेवारी 2021 ला हा निर्णय लागू करण्यात येणार होता. परंतू कोव्हिड मुळे हा निर्णय टाळण्यात आला होता.
अमेरिका : जगातील सर्वाधिक सोन्याचे भंडार अमेरिकेकडे आहे. 8133.5 टन सोने अमेरिकेकडे आङे. युनायटेड स्टेट्सच्या बुलियन डिपॉजिटरीमध्ये सोने जमा करून ठेवण्यात आले आहे. या सोन्याचे प्रबंधन ट्रेझरी डिपार्टमेंट ऑफ युनायटेड स्टेट्स करीत असते.
जर्मनी : या युरोपीय देशाकडे 3362.4 टन सोन्याचे भंडार आहे. यासोबतच सोन्याच्या भंडाराबाबत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीचे सोने भंडार फ्रॅकफर्टमध्येच्या ड्युश बुंडेस बँकेत, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या न्यूयॉर्क शाखेत आणि लंडनच्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले आहे.
इटली : आपल्या ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध असलेल्या इटली देशात 2451.8 टन सोन्याचे भंडार आहे. यात बहुतांष सोन्याच्या विटा आहेत. बँक ऑफ इटली या सोन्याची देख-रेख ठेवते.
फ्रांस : देशाच्या मध्यवर्ती बँकेने काही सोने विकले होते. त्यानंतर फ्रांसकडे आता. 2435 टन सोन्याचे भंडार आहे. सोने भंडाराच्या बाबतीत फ्रांसचा चौथा क्रमांक लागतो.
रशिया : गेल्या सात वर्षात रशियाचे सोन भंडार 2299.9 टनांवर टिकून आहे. सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत रशिया जगात पाचव्या स्थानावर आहे.
चीन : सध्या चीनकडे 1948.8 टन इतके सोने भंडार आहे.
स्वित्झरलँड : जगातील श्रीमंत देशांमध्ये स्वित्झरलँडचा सहभाग होतो. देशाकडे सध्या 1040 टन सोन्याचे भंडार आहे. दुसऱ्या महायुद्धात स्वित्झरलँड तटस्थ देश होता. त्यानंतर युरोपातील गोल्ड व्यापाराचे केंद्र म्हणून स्वित्झरलँड उदयास आला होता.
जपान : आशियातील महाशक्ती म्हणवणाऱ्या जपानकडे 765 टन सोन्याचे भंडार आहे. जपान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. सोन्याच्या भंडारात जपानचा जगात 8 वा क्रमांक लागतो.
भारत : जगात सोन्याच्या दाग दागिन्यांना महत्व देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रंमाक वरचा आहे, परंतु जगाच्या तुलनेत भारताकडे 657 टन सोन्याचे भंडार आहे. जागतिक सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत भारताचा नववा क्रमांक लागतो.
नेदरलॅंड : ऐतिहासिक कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलॅंडकडे 612 टन सोन्याचे भंडार आहे. याबाबतीत नेदरलॅंडचा जगात 10 वा क्रमांक लागतो.