Trending Video : भारतीय रेल्वेतील चहाबद्दल धक्कादायक खुलासा, प्रवाशांची उडाली झोप

Updated: Nov 7, 2022, 01:52 PM IST

video_Using_rusty_rod_heat_tea_water

Railway Tea Video : हिवाळा (winter 2022) असो किंवा पावसाळा कुठल्याही ऋतूमध्ये गरमा गरम चहा प्यायची (Tea Lover) मजाच काही और असते. अनेकांची सकाळ ही चहाशिवाय होतं नाही. दर्दी चहाप्रेमींना तर चहा प्यायचा बहाणाच लागतो. भारतामध्ये पाहावं तिकडे चहाचे स्टॉल बघायला मिळतात. अगदी भारतीय रेल्वेमधून प्रवास करतानाही आपला जोर चहा पिण्यावर राहतो. पण थांबा... सध्या सोशल मीडियावर (Social media) भारतीय रेल्वेमधील चहाचा व्हिडीओ व्हायरल (Video of tea in Indian Railways goes viral) होतो आहे तो पाहून तुम्ही कायमचं चहा प्यायला विसरुन जाल. हा व्हिडीओ पाहून कायम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झोप उडाली आहे. 

 

भारतीय रेल्वेतील चहा पिताय? (Drinking tea in Indian Railways?)

हा व्हिडीओ पाहून तुम्ही रेल्वेमध्ये चहाचं नावाचं घेणार नाहीत. सोशल मीडियावर या पूर्वी रेल्वेमधील चहा बनविण्यासाठी टॉयलेटचं पाणी वापरण्यात येतं असाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता भारतीय रेल्वेतील चहाबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहाचं पाणी गरम करण्यासाठी चहा विक्रेता एका गंजलेल्या रॉडचा वापर (Tea vendor uses unclean iron rod to heat tea on train) करत आहे.  (Viral video Using a rusty rod to heat tea water on train nmp )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHAL (@cruise_x_vk)

 

वाचा - Road Accident : लोक रस्ता ओलांडत होती आणि... Video पाहून बसेल धक्का

अन् तुम्ही प्यायला विसरुन जालं!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. व्हिडीओमधील घटना हैदराबाद आणि तिरुवअनंतपूर (Hyderabad and Thiruvananthapuram) दरम्यान धावणाऱ्या साबरी एक्स्प्रेसमधील (Sabri Express) असल्याचं बोलं जातं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान भारतीय रेल्वे विभागाकडून अजून या व्हिडीओवर काही रिप्लाय आलेला नाही. त्यामुळे आता भारतीय रेल्वे विभाग यावर काय कारवाई करतं हे पाहवं लागेल.